जगातल्या सर्वांत खतरनाक लष्करी तुकडीत सामील होणार धोनी, ‘हे’ आहे Victor Forceचं काम

जगातल्या सर्वांत खतरनाक लष्करी तुकडीत सामील होणार धोनी, ‘हे’ आहे Victor Forceचं काम

पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे.

  • Share this:

काश्मीर, 25 जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं देशसेवा करण्याच्या दिशेने एक पाऊल उचललं आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत असताना आता धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता लष्करात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे.

धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहत सराव करणार आहे. दरम्यान या अंतर्गत धोनी लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये धोनी ट्रेनिंग घेणार आहे. यात पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी या सारख्या जबाबदाऱ्या धोनी सांभाळणार असल्याची लष्करी अधिकाऱ्याची माहिती दिली.

काश्मीरच्या खोऱ्यात पेट्रोलिंग करणार धोनी

पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. 2011 सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. याच रेजिमेंटमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सर्वात खतरनाक मानल्या जाणाऱ्या विक्टर फोर्स मिशनमध्ये धोनी सराव करणार आहे.

वाचा-काश्मीरच्या खतरनाक विक्टर फोर्समध्ये 15 दिवस ट्रेनिंग करणार धोनी!

1990मध्ये राष्ट्रीय रायफल्स फोर्सची स्थापना

80च्या दशकात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं उत्तर-पूर्व राज्यातील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1990मध्ये राष्ट्रीय रायफ्सल फोर्सची स्थापना करण्यात आली.

वाचा-निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार युवराज सिंग, येथे पाहू शकता सामना

पाच युनिटमध्ये राष्ट्रीय रायफल्सची विभागणी

आतंकवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स विभागाची पाच युनिटमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात रोमियो फोर्स, डेल्टा फोर्स, विक्टर फोर्स, किलो फोर्स आणि युनिफॉर्म फोर्स यांचा समावेश आहे. काश्मीच्या घाट परिसरात विक्टर फोर्सची नियुक्ती केली जाते. यात अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम ही शहरे येतात.

2015मध्ये धोनीनं घेतले होते ट्रेनिंग

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

IND vs WI : टीम इंडियात हार्दिक पांड्याची कमी पूर्ण करणार 'हे' तीन अष्टपैलू खेळाडू

VIDEO : लेफ्टनंट कर्नल धोनी लष्करात निभावणार ही जबाबदारी, संध्याकाळच्या 18 सुपरफास्ट बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 06:50 PM IST

ताज्या बातम्या