DRS…धोनी कभी गलत नहीं हो सकता! पाहा VIDEO

DRS…धोनी कभी गलत नहीं हो सकता! पाहा VIDEO

धोनीच्या नेतृत्वात या संघात कुठल्याही मैदानावर कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून देण्याची ताकद आहे.

  • Share this:

जयपूर, 11 एप्रिल : एकीकडं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात या संघात कुठल्याही मैदानावर कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच खुद्द धोनी म्हणजे, जगज्जेता. असा कोणताही निर्णय नाही, जो धोनीचा चुकेल. कारण धोनी कभी गलत नहीं हो सकता.

सध्या सवाई मानसिंग मैदानात सुरु असलेल्या राजस्थान विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात धोनीनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय काहीसा भारी पडल्याचं चित्र दिसत होतं. बटलरनं आणि अजिंक्य रहाणे यांनी सलामीला येत आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. सलामीची जोडी फोडण्यासाठी धोनीनं आपलं सर्वात चांगल अस्त्र म्हणजेच दीपक चहरला गोलंदाजी दिली. चहरच्या तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूत रहाणेला त्यानं आपल्या जाळ्यात अडकवलं. पण पंचानी नाबाद दिल्यानंतर सर्व संघाच्या विरोधात जाऊन धोनीनं अखेर शेवटच्या क्षणात या LBWच्या निर्णयाला आव्हान दिले.

आणि नेहमीप्रमाणं धोनीचा निर्णय यशस्वी ठरला. अजिक्य रहाणे 11 चेंडूत 14 धावा करत बाद झाला.

एकीकडं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात या संघात कुठल्याही मैदानावर कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. राजस्थान मात्र संघर्ष करीत असून, स्पर्धेत कायम राहण्यासाठी संघाला उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत.

आतापर्यंत राजस्थाच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याउलट चेन्नई अधिक बलाढ्य वाटतो. धोनीसह शेन वाटसन व फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू व केदार जाधव हेही धावा काढण्यात योगदान देत आहेत.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading