VIDEO : पाहा सामन्याआधीच धोनीची धडाकेबाज फलंदाजी

धोनीला सरावा दरम्यान टाकण्यात आलेल्या सर्व चेंडू थेट मैदानाबाहेर धाडले. धोनीच्या या तडफदार फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल...

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 09:26 PM IST

VIDEO : पाहा सामन्याआधीच धोनीची धडाकेबाज फलंदाजी

चेन्नई, 22 मार्च: शनिवारपासून सुरू होत असलेल्या IPLच्या पहिल्याच सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहली आमने सामने येणार आहेत. चेन्नईच्या मैदानावर रंगणाऱ्या या हाय वोल्टेज सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणावर गर्दी करतीय यात काही वाद नाही. मात्र, पहिला सामना सुरू होण्याआधीच धोनीने आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर धोनीने केलेल्या सरावात धोनीने धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली. या सरावादरम्यान धोनीने सर्व चेंडू थेट मैदानबाहेर धाडले. धोनीच्या या तडफदार फलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Loading...दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर चेन्नईने गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादवर मात केली होती. धोनीच्या चेन्नई सुपर किंगज संघाने आतापर्यंत 2010, 2011,2018 असे तीनवेळा आयपीएल चषक जिंकले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातही धोनीच्या चेन्नई संघाला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र, आयपीएलचा सामना सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीला एक मोठा झटका बसला आहे. साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज लुंगी न्गिदी या गोलंदाजाने माघार घेतली आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ एका चांगल्या जलद गोलंदाजाच्या शोधात सध्या आहेत.


VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...