IPL 2019 : अशा मैदानावर यापुढं आम्ही खेळणारच नाही, धोनीची सटकली

IPL 2019 : अशा मैदानावर यापुढं आम्ही खेळणारच नाही, धोनीची सटकली

कोलकतावर विजय मिळवूनही धोनी खेळपट्टीवर नाराज.

  • Share this:

चेन्नई, 10 एप्रिल : आपल्या विजयरथा बरोबरच महिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या चेन्नई संघानं आपल्या घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवला. मात्र, हा विजय मिळवूनही धोनी या खेळपट्टीवर नाराज आहे.

चेपॉकवर आतापर्यंत सर्व सामने चेन्नई संघानं जिंकले आहेत. मात्र आता यापुढं या खेळपट्टीवर एकही सामना खेळणार नाही, असा आक्रमक पवित्रा चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं घेतला आहे. तसेच, या खेळपट्टीमुळे मोठी धावसंख्या करणे कठीण आहे. खेळपट्टी संथ असतानाही आम्ही विजय मिळवला, असंही धोनी म्हणाला.

आयपीएलच्या या सत्रातात आतापर्यंत चेन्नईने होम ग्राऊंडवरील सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. येथे झालेल्या चारही सामन्यात चेन्नईने विजयी पताका फडकावली आहे. त्यानंतरही धोनीने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी चेन्नईने कोलकात्याचा सात विकेटने पराभव केला. या पाचव्या विजयासाह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाताने ९ गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकांत १०८ धावा केल्या होत्या. चेन्नईने हे लक्ष्य १७.२ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले आहे.

यावेळी धोनीनं अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंह आणि इम्रान ताहिरचे कौतुक करत, ताहिर आणि भज्जी उत्कृष्ट गोलंदाज आहेत, असंही सांगितलं. याआधी आयपीएलच्या सलामी सामन्यातही बंगळुरू विरोधात चेन्नईनं विजय मिळवला होता. मात्र त्या सामन्यानंतरही ही खेळपट्टी निराशाजनक असल्याचं वक्तव्य धोनीनं केलं होतं.

यावर चाहत्यांनीही, बीसीसीआयनं ही खेळपट्टी बॅन करावी, अशी टीका केली आहे.

तर एका चाहत्यानं चेन्नई सामना जिंकत असला तरी धोनीनं घेतलेला पवित्रा योग्य आहे. चेपॉक खेळण्यास योग्य नाही, असे ट्विट केले.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 10, 2019, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading