'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकसुद्धा स्ट्रॉबेरी दिसणार नाही!'; पाहा धोनीचा मजेशीर VIDEO

'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकसुद्धा स्ट्रॉबेरी दिसणार नाही!'; पाहा धोनीचा मजेशीर VIDEO

धोनीच्या चाहत्यांनो पाहा व्हिडीओमधून काय म्हणतोय माही...

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी : महेंद्र सिंह धोनी अर्थात एमएस धोनी (MS Dhoni) म्हणजे भारतीय क्रिकेटजगतातलं (Indian cricket) एक लोकप्रिय नाव. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर (retirement from cricket) धोनी आता आपल्या पत्नी (wife) आणि मुलीसोबत (daughter) क्वालिटी टाइम घालवतो. सोबतच त्याला अजून एक छंद जडला आहे.

धोनी आता सेंद्रिय भाज्या आणि फळांमध्ये (organic fruits and vegetables) रस घेतो आहे. धोनी सोशल मीडियावरही (social media) बराच सक्रिय असतो. यादरम्यानच धोनीनं आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. यात तो आपल्या फार्ममध्ये (farm) पिकलेल्या ताज्या स्ट्रॉबेरीज (strawberries) खाताना दिसतो आहे. त्यानं व्हिडीओसोबत लिहिलं आहे, 'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकसुद्धा स्ट्रॉबेरी दिसणार नाही!'

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

धोनीच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी एकाहून एक गंमतीदार आणि कौतुक करणाऱ्या कमेंट्स दिल्यात. अनेकांनी हा व्हिडीओ लाईकसुद्धा केला आहे. धोनीला मागच्या महिन्यात आयसीसी मेन्स वनडे आणि टी-२० टीम ऑफ द डिकेडचा कप्तान म्हणून निवडलं होतं. याशिवाय २०११ मध्ये नॉटिंगहॅम टेस्टच्या दरम्यान इंग्लंडचे बॅट्समन इयान बेल याला पॅव्हेलियनमधून वापस बोलावल्याबद्दल धोनीला स्पिरीट ऑफ द क्रिकेट हे अवॉर्डही मिळालं.

धोनीनं मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीनं एकूण  ३५० वनडे खेळल्या. धोनीचं नाव जगातील सर्वात यशस्वी कप्तानांपैकी एक म्हणून घेतलं जातं. धोनीनं आफ्रिकेत आयोजित केलेल्या आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेत भारताला विजय मिळवून दिला. यानंतर त्याच्याच नेतृत्वात २०११ मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषकातही टीम इंडिया विजयी झाली. धोनीनं डिसेंबर २०१४ मध्ये क्रिकेटमधून संन्यास घेतला.

Published by: News18 Desk
First published: January 17, 2021, 5:32 PM IST

ताज्या बातम्या