World Cup : धोनीला धक्का, त्या ग्लोव्ह्जबाबत बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

आयसीसीने आक्षेप घेतल्यानंतर धोनीने ग्लोव्ह्ज वापरणारच असा पवित्रा घेतला होता. पंरतु, आता बीसीसीआयने या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 10:23 PM IST

World Cup : धोनीला धक्का, त्या ग्लोव्ह्जबाबत बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

लंडन, 07 जून : भारतीय टीमचा कूल कर्णधार राहिलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवरून चांगलाच वाद पेटला आहे. आयसीसीने आक्षेप घेतल्यानंतर धोनीने ग्लोव्ह्ज वापरणारच असा पवित्रा घेतला होता. पंरतु, आता बीसीसीआयने या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

या प्रकरणी बीसीसीआयने आयसीसीला उत्तर दिलं आहे. पैरा स्पेशल फोर्सचं चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज धोनीला वापरता येणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे धोनीला पुढील सामन्यात हे ग्लोव्ह्ज काढून ठेवावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

भारतानं ICC World Cupमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत मिशन वर्ल्डकपला सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी करत सर्वांचे मन जिंकले, पण चर्चा झाली ती धोनीच्या ग्लोव्ह्जची. भारताच्या गोलंदाजी दरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्स या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नाही, की कोणत्या खेळाडूनं लष्काराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असेल. दरम्यान, पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते.

दरम्यान, 2011मध्ये महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी हा भारतीय सैनाच्या 106 पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. तर, 2015 साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच या सामन्यात धोनी हे चिन्ह परिधानकरुन मैदानात उतरला. एवढेच नाही तर, धोनीच्या किटबॅगचा रंगही लष्कराचा आहे. मात्र आयसीसीला धोनीनं लष्कराच्या रंगाचा किटबॅट वापरण्यावर आक्षेप नाही. मात्र ग्लोव्ह्जवरुन आयसीसीनं बीसीसीआय आणि धोनीला फैलावर घेतले आहे.

ICCनं बीसीसीआयकडे केली हे चिन्हा काढण्याची मागणी

या सगळ्या प्रकरणावर आयसीसीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली होती.

काय आहे ICCचा नियम

आयसीसीच्या जी1 नियमानुसार, खिलाडी किंवा टीम अधिकारी लष्करी बॅंड किंवा कपडे किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये व्यक्तिगत संदेश देऊ शकत नाही. जर तसे करायचे असल्यास त्याकरिता क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसी यांची संमती असणे गरजेचे आहे. राजकिय, धार्मिक किंगा रंगभेद यावरील वक्तव्य किंवा कृतीसाठी बोर्ड परवानगी देत नाही. जर कोणत्या एका खेळाडूला बोर्डनं मंजूरी दिली असली तरी आतंरराष्ट्रीय सामन्यात त्यांना या गोष्टी प्रदर्शित करण्याची संमती नसते.

बीसीसीआयचं आधी स्पष्टीकरण नंतर निर्णय

या सर्व प्रकरणावर बीसीसीआयनं आयसीसीला आधी स्पष्टीकरण देऊन धोनीची बाजू घेतली होती. 'धोनीच्या बलिदान या ग्लोव्ह्जमागे कोणताही राजकीय किंवा धार्मिक हेतू नव्हता. त्यामुळं आता धोनीनं हे ग्लोव्ह्ज वापरायचे की नाही, याच अंतिम निर्णय आयसीसीकडे असणार आहे. BCCI प्रशासक विनोद राय यांनी ANIला दिलेल्या प्रतिक्रियेत, “आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ”, असंही त्यांनी सांगितलं. अखेर शुक्रवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे बैठक पार पडली. या बैठकीत धोनीने ग्लोव्ह्ज वापरू नये, यावर शिक्कामोर्तब झालं.

===============


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close