S M L

धोनी वनडेतील दहा हजार धावांपासून फक्त 100 धावा दूर

धोनीच्या आतापर्यंत वनडेमध्ये 9898 धावा पूर्ण झाल्या आहे. 10 हजाराच्या मोठ्या आकड्यापासून धोनी फक्त 102 धावा दुर आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 31, 2018 06:12 PM IST

धोनी वनडेतील दहा हजार धावांपासून फक्त 100 धावा दूर

31 जानेवारी: 1 फेब्रुवारीला भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये  सहा एकदिवसीय सामन्यांची  मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक विक्रम करण्याची संधी महेंद्र सिंग धोनीला आहे.त्यातच सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे ते म्हणजे धोनी 10 हजार धावा करणे.

धोनीच्या आतापर्यंत  वनडेमध्ये 9898 धावा पूर्ण झाल्या आहे. 10 हजाराच्या मोठ्या आकड्यापासून धोनी फक्त 102 धावा दुर आहे. या सिरीजमध्ये हा आकडा गाठणं धोनीला सहज शक्य आहे. याआधी सचिन तेंडुलकर , राहुल द्रविड ,सौरभ गांगुली हे तीनच खेळाडू हा आकडा पार करू शकले आहेत. तेव्हा धोनीने दहा हजार धावा पूर्ण केल्यास तो असं करणार चौथा खेळाडू ठरेल.

तसंच विकेट कीपर म्हणून 400 विकेट घेण्यासाठी फक्त दोन झेल किंवा स्टम्प आऊट करण्याची धोनीला गरज आहे. हे दोन महत्त्वाचे विक्रम धोनी करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अस केल्यास 400 विकेट घेणारा पहिला भारतीय विकेट कीपर धोनी ठरेल. कुमार संगकारा , अॅडम गिलख्रिस्ट,मार्क बाऊचरने फक्त त्याहून जास्त विकेट विकेट कीपर म्हणून घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close