IPL 2019 : कॅप्टन कुल धोनी बनला अ‍ॅंग्री यंग मॅन, आयपीएलनं केली 'ही' कारवाई

शेवटच्या षटकात असं काही घडलं की धोनीला राग अनावर झाला. धोनीचा हा अवतार पाहून त्याचे फॅनही अवाक झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 05:57 PM IST

IPL 2019 : कॅप्टन कुल धोनी बनला अ‍ॅंग्री यंग मॅन, आयपीएलनं केली 'ही' कारवाई

जयपूर, 12 एप्रिल : भारताचा माजी कर्णधार आणि दिग्ग्ज फिनीशर असेलेला कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. शेवटच्या षटकात असं काही घडलं की धोनीला राग अनावर झाला.

राजस्थान विरोधात धोनीची झुंज यशस्वी झाली आणि चेन्नईनं सामना राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानात नमवलं. पण या सामन्यात धोनी एक वेगळ्याच रुपात पाहायला मिळाला. धोनीने बाद झाल्यानंतर नो बॉलवरुन झालेल्या वादावरुन तो थेट डगाऊटमधून मैदाना आला आणि पंचांशी भिडला.मात्र धोनीच्या या अ‍ॅंग्री यंग मॅन बनण्याचे परिणाम त्याला भोगावं लागले.

पंचाशी गैरवर्तणुक केल्या प्रकरणी धोनीवर आयपीएलच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. मैदानात येऊन नियम मोडल्याप्रकरणी धोनीचे ५० टक्के मानधन कापले जाणार आहे. यासंदर्भात आयपीएलकडून रात्री उशीरा एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रात, ‘राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चेन्नई सुपकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या सामन्याच्या मानधानापैकी ५० टक्के रक्कमेचा दंड केला जात आहे. आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे धोनीने लेव्ह दोनमधील २.२० या नियमांमध्ये बसणारी चूक केली आहे. दरम्यान त्यानं ही आपली चुक मान्यही केली आहे. त्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

का भडकला धोनी?

राजस्थान आणि चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली. मात्र चेन्नईकडून रायडू आणि धोनी यांनी केलेली 95 धावांची भागीदारी मॅच विनिंग ठरली. दरम्यान शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. या ओव्हरच्या या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जडेजानं सिक्स मारला तर, दुसरा नो बॉल होता. तिसऱ्या बॉलवर मात्र बेननं धोनीची विकेट घेतली. मात्र या ओव्हरचा चौथा बॉल वादग्रस्त ठरला. मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी धोनीच थेट मैदानात उतरला आणि अम्पायरशी भिडला. त्यामुळं हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला.

Loading...काय आहे नियम 2.20

आयपीएलच्या नियमावलीमध्ये विविध नियमांचा समावेश करण्यात आला आहे. यातील नियम 2.20 नुसार खेळ भावनेला धक्का पोहचवणाऱ्या खेळाडूवर कारवाई करण्यात येते. दरम्यान धोनी विरोधात याच नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र आयपीएलनं जारी केलेल्या पत्रकामध्ये धोनीने या नियमांचे उल्लंघन कसं केलं यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही.VIDEO : मोदींच्या सभेपूर्वी भाषण रोखल्यानं दिलीप गांधी भडकले, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...