Home /News /sport /

धोनीच्या क्रिकेट करिअरवर या खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला आता धोनी परत येणार नाही!

धोनीच्या क्रिकेट करिअरवर या खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला आता धोनी परत येणार नाही!

धोनीच्या क्रिकेट करिअरवर या खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला आता धोनी परत येणार नाही!

    नवी दिल्ली,  8 जानेवारी : कॅप्टन कूल धोनी वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून दूरच आहे. गेल्या 6 महिन्यांपासून धोनी क्रिकेट खेळलाच नाही. त्यामुळं धोनीच्या क्रिकेट करिअरविषयी पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाली.  काही महिन्यांपूर्वी धोनीनं आपण अजूनही क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं होतं.. तसेच काही महिने वाट पाहा जानेवारी महिन्यात बोलणार असल्याचं धोनी म्हणाला होता. त्यामुळं माही क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट चाहत्यांना कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डीन जॉन्स यांनी धोनीच्या करिअरवर प्रश्न उपस्थित केले. धोनी आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर येणार नसल्याचं विधान डीन जॉन्स यानं केलं. त्यामुळे पुन्हा धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसणार की नाही याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. माहीमध्ये भरपूर क्रिकेट क्षिल्लक असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं धोनीच्या क्रिकेट करिअरवर प्रश्न उपस्थित केला. इंदूरमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान पहिला टी-20 सामना पार पडला. यावेळी फॅन्सना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर एका चाहत्यानं महेंद्र सिंह धोनीशिवाय आणखी एक सीरिज झाल्याचं म्हटलं. जगातील सर्वात महान विकेटकीपरशिवाय भारतीय क्रिकेट पाहताना कसं वाटतं, या प्रश्नाचं उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डीन जॉन्स यानं धोनीचं खेळणं आता मुश्किल असल्याचं दिसत असल्याचं म्हटलं. कारण नवा चेहरा असलेला ऋषभ पंत चांगला खेळ करत असल्याचं डीन जॉन्स म्हणाला. एवढचं नाही तर पंत याच्यानंतर संजू सॅमसनही असल्याचं त्यानं सांगितलं. यावेळी पंत आणि संजू दोघेही उपस्थित होते. पण धोनीबद्दल पुन्हा विचारल्यानंतर त्याविषयी बोलताना डीननं "धोनी कधीच खेळणार नाही असंही म्हणता येणार नाही. कारण खेळाच्या मैदानावर अनेकदा काहीही घटना घडू शकतं. त्यामुळं धोनीबाबत काहीही शक्य आहे", असं सांगितलं. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वर्ल्डकपची सेमीफायनल झाली होती. त्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनी गेला नव्हता. देशांतर्गत क्रिकेटही धोनी खेळला नाही. धोनी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवतोय. क्रिकेट सोडून इतर खेळांवर धोनी लक्ष केंद्रित करतोय. काही दिवसांपूर्वी धोनीनं जानेवारी महिन्यापर्यंत काहीही विचारू नका असं सांगितलं होतं. त्यामुळं जानेवारी महिना आता सुरू झाला. धोनी आता क्रिकेट करिअरविषयी काय निर्णय घेणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ------------------------- अन्य बातम्या भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर अजिंक्यची चिमुकली बाबांच्या Hero ला भेटली तेव्हा... ...आणि कॅप्टन कोहलीनं मैदानात केली भज्जी स्टाईल गोलंदाजी, VIDEO VIRAL
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Dhoni, Dhoni dicision, Sanju Samson, Team india

    पुढील बातम्या