धोनीने वेळ साधली पण नशिबाने डाव उलटला, पाहा VIDEO

धोनीने वेळ साधली पण नशिबाने डाव उलटला, पाहा VIDEO

धोनीने अचूक थ्रो केला पण तरीही लोकेश राहुल बाद होऊ शकला नाही.

  • Share this:

चेन्नई, 06 एप्रिल : किंग्ज इलेव्हन पंजाबला 138 धावांत रोखून चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईचा हा चौथा विजय आहे. चेन्नईने पंजाबसमोर 161 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला दुसऱ्याच षटकात दोन फलंदाज बाद करत चेन्नईने धक्का दिला. त्यानंतर लोकेश राहुल आणि सर्फराज खानने 110 धावांची भागिदारी केली. तेव्हा पंजाबला विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यानंतरचे फलंदाज धावा करू न शकल्याने चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवला.

धोनीच्या चपळतेबद्दल बोलावं तितकं कमीच. आयसीसीनेदेखील धोनी मागे असताना फलंदाजांनी क्रीज सोडण्याचं धाडस करू नये असं म्हटलं होतं. मात्र, पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने फलंदाज क्रीजपासून दूर असताना केलेल्या थ्रोमुळे बेल्स न पडल्याने केएल राहुल वाचला. त्यावेळी राहुल 41 धावांवर खेळत होता.

लोकेश राहुलचे अर्धशतक झाल्यानंतर कुग्गलेनने त्याला बाद केले. लोकेश राहुलने 1 षटकार आणि 3 चौकारासह 55 धावा केल्या. तर सर्फराज खानने 59 चेंडूत 67 धावा केल्या. यात 4 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्यालाही कुग्गलेनने बाद केले. त्याआधी डेव्हिड मिलरला चहरने 6 धावांवर बाद केले. शेवटच्या षटकांमध्ये धावगती वाढल्याने पंजाबवर दबाव वाढला.

'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'

First published: April 6, 2019, 8:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading