धोनीने विकत घेतला महागडा घोडा, स्कॉटलंडहून रांचीला आणला

धोनीने विकत घेतला महागडा घोडा, स्कॉटलंडहून रांचीला आणला

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सध्या त्याच्या रांचीच्या फार्म हाऊसवर निवृत्तीनंतरचं आयुष्य एन्जॉय करत आहे. ऑर्गेनिक शेतीबरोबरच धोनीच्या घरात पाळीव प्राणीही आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये चेतक या घोड्याला साथ द्यायला आणखी एक घोडा आला आहे.

  • Share this:

रांची, 7 जून : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सध्या त्याच्या रांचीच्या फार्म हाऊसवर निवृत्तीनंतरचं आयुष्य एन्जॉय करत आहे. ऑर्गेनिक शेतीबरोबरच धोनीच्या घरात पाळीव प्राणीही आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये चेतक या घोड्याला साथ द्यायला आणखी एक घोडा आला आहे. शेटलँड पोनी जातीचा हा घोडा बुधवारी स्कॉटलंडवरून रांचीला आणण्यात आला आहे. यानंतर आता तो धोनीच्या सिमलियामधल्या घरात पोहोचला आहे. 2 वर्षांचा हा घोडा जगातल्या सगळ्यात लहान जातीच्या घोड्यांपैकी एक आहे. या घोड्याची उंची 3 फूटांच्या आसपास असते. शेटलँड पोनी जातीचा घोडा त्याच्या वेगासाठी नाही, तर सजावटीसाठी ओळखला जातो. या घोड्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमतही खूप जास्त आहे.

शेटलँड पोनी जातीचा हा घोडा धोनीच्या सिमलियातल्या घरी ठेवण्यात आला आहे. धोनीची मुलगी झिवा (Ziva Dhoni) या घोड्यासोबत बराच वेळ घालवते. तर धोनीकडे असलेला चेतक हा आणखी एक घोडा सॅम्बोमधल्या फार्म हाऊसमध्ये आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी या फार्म हाऊसवर आली होती, तेव्हा तिने चेतकचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. तेव्हा तिने गोशाळेत गायींना चाराही खायला घातला. धोनी आणि त्याच्या कुटुंबाचं पाळीव प्राण्यांवर प्रेम आहे.

धोनीच्या फार्म हाऊसवर आलेला पहिला घोडा चेतक आता 11 महिन्यांचा आहे. हा घोडा मारवाडी जातीचा आहे. काळ्या रंगाचा असलेला चेतक त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. तर शेटलँड पोनी जातीचा घोडा पांढऱ्या रंगाचा आहे. स्कॉटलंडवरून हा घोडा भारतात आणण्यासाठी धोनीने लाखो रुपये खर्च केले. धोनीच्या फार्महाऊसमध्ये सघ्या हॉर्स रायडिंगची तयारी सुरू आहे, त्यामुळे 5 ते 6 घोडे बाहेरून मागवण्यात येणार आहेत.

Published by: Shreyas
First published: June 7, 2021, 7:42 PM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या