VIDEO : जेव्हा धोनी सर्व फलंदाजांवर पडतो भारी...

VIDEO : जेव्हा धोनी सर्व फलंदाजांवर पडतो भारी...

एकीकडं धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे काहींचे मत असताना, धोनी मात्र आजही युवा फलंदाजांना लाजवेल अशी फलंदाजी करत आहे.

  • Share this:

चेन्नई, 31 मार्च : आयपीएलच्या सर्व हंगामात सर्वात यशस्वी संघ कोणाचा असेल तर तो, धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज. यंदाही धोनीनं आपली कमाल दाखवत सलग दोन सामने जिंकले.

दरम्यान एकीकडं धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे काहींचे मत असताना, धोनी मात्र आजही युवा फलंदाजांना लाजवेल अशी फलंदाजी करत आहे. नुकताच चेन्नईच्या सराव सामन्यादरम्यान धोनी विरुद्ध इतर फलंदाज असा सामना रंगला असताना, यातही धोनीचं जिंकला. यावेळी धोनीनं दोन हेलिकॉप्टर शॉट लगावले.2008पासून धोनीकडे चेन्नई संघाचे कर्णधारपद आहे. गेले दोन सामने जिंकल्यानंतर आज धोनीचा संघ आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान विरोधात खेळत आहे. दरम्यान राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत, अंबाती रायडूला एका धावावरच बाद केले. तर, वॉटसन आणि केदार जाधवही लवकर बाद झाले.


मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:57 PM IST

ताज्या बातम्या