IPL 2019 : धोनीला आता 'या' खेळात झिवा देणार टक्कर

IPL 2019 : धोनीला आता 'या' खेळात झिवा देणार टक्कर

चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची लेक झिवा, दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चिले जातात.

  • Share this:

चेन्नई,  29 मार्च :  आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपरकिंग्जचा संघ ओळखला जातो. गजविजेत्या चेन्नईनं दोनही सामने जिंकत दणक्यात सुरूवात केल्यानंतर आता कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, धोनीपेक्षा सध्या सोशल मिडीयावर आकर्षणाचा विषय ठरली आहे ती, धोनीची लेक झिवा.

याआधी धोनीनं घेतलेल्या परिक्षेत झिवा पास झाल्यानंतर आता, धोनी सध्या झिवाला एक खेळ शिकवत आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, धोनी आपल्या मुलीला शिकवत असलेला खेळ क्रिकेट नसून कॅरम आहे. झिवा आणि धोनीचे कॅरम खेळतानाचे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यांचे हे छायाचित्र चेन्नईच्या आयपीएल इन्स्टाग्राम पेजवरही शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

Striker par excellence matches up with kutty lioness! #WhistlePodu #Yellove

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

या छायाचित्रामध्ये धोनी त्याची मुलगी झिवासोबत कॅरम खेळताना दिसत आहे. त्यात एकीकडे धोनी बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला झिवा बसली आहे. तसेच दोघेही स्ट्रायकरच्या मदतीने निशाणा लावताना दिसत आहे. झिवा प्रत्येक सामन्यात आपल्या बाबाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर सज्ज असते.

 

View this post on Instagram

 

'Paaapaaaaa, comeon papaa!' What better than cheering for your dad at his workplace?! #Ziva #WhistlePodu #Yellove #DCvCSK

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

चेन्नईचा आपला तिसरा सामना आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान विरोधात रविवारी होणार आहे. त्यामुळे धोनीचे किंग्ज सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहेत. सध्या खेळाडूंचा कसून सराव सुरू आहे.

POINTS TABLE:

SCHEDULE TIME TABLE:

ORANGE CAP:

PURPLE CAP:

RESULTS TABLE:

VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग

First published: March 29, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading