19 सप्टेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या धमाकेदार विजयानंतर, टीम इंडिया कोलकात्तासाठी रवाना होताना एअरपोर्टवर टीमला काही वेळ वाट बघावी लागली.आणि यावेळी महेंद्रसिंग धोनी जमिनीवरच पहुडला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार इनिंगनंतर धोनीनं जमिनीवर आराम करणं पसंत केलं. तर विराट कोहली आणि इतर खेळाडू जमिनीवर बसून गप्पा मारत होते. चेन्नई विमानतळावरचे टीम इंडियाचे हे फोटो बीसीसीआयनं ट्विट केलेत. आणि हे फोटो व्हायरल झालेत.
पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतलीये. विशेष म्हणजे भारताचा हा सलग दहावा विजय आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताने सलग १० ही सामने खिश्यात घातले होते.