Elec-widget

IPL 2019 : 'गुरू गुरू होता है'...धोनीची रिषभ पंतबरोबर तुलना करणाऱ्यांनी हा VIDEO पाहाच

IPL 2019 : 'गुरू गुरू होता है'...धोनीची रिषभ पंतबरोबर तुलना करणाऱ्यांनी हा VIDEO पाहाच

गेली काही वर्षे धोनीची फलंदाजी तेवढी आक्रमक नसली तरी, अजूनही स्टम्पिंगमध्ये धोनीचा हात कोणी धरू शकत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : अनुभवी यष्टीरक्षक व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा ऋषभ पंत यांच्यात मंगळवारी जुगलबंदी पाहायला मिळाली. गेली काही वर्षे धोनीची फलंदाजी तेवढी आक्रमक नसली तरी, अजूनही स्टम्पिंगमध्ये धोनीचा हात कोणी धरू शकत नाही. धोनीला स्टम्पिंगचा मास्टर मानले जाते.

त्यामुळे धोनीनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनीची जागा कोण घेणार यावरून अनेक वाद झाले. मात्र शेवटी वर्णी लागली ती युवा फलंदाज रिषभ पंत याची. मंगळवारी दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यादरम्यान रिषभनं शेन वॉटसनला केलेल्या स्टम्पिंगनंतर धोनी श्रेष्ठ की त्याचा चेला श्रेष्ठ, अशी चर्चा सोशल मिडीयावर रंगण्यास सुरूवात झाली आहे. त्याचाच व्हायरल झालेला हा एक व्हिडीओ.


Loading...


तर, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई यांच्यातला सामना रंगतदार होणार अशी अपेक्षा असताना, चेन्नईच्या थालानं म्हणजेच कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईला 6 विकेट राखत सामना जिंकून दिला.

दिल्लीकडून धवन वगळता दिल्लीचा एकाही फलंदाजाली चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे दिल्लीला केवळ 147 धावा करता आल्या. 148 धावांचा पाठलाग करत असताना, चेन्नईची सुरुवात काहिशी डळमळीत झाली. चेन्नई संघाचा स्टार सलामीवीर अंबातू रायडू केवळ 5 धावा करत बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैनानं चांगली फलंदाजी केली. वॉटसन 44 तर, रैना 30 धावा करुन बाद झाला. चेन्नईचा हा 150वा आयपीएल विजय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Mar 26, 2019 11:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...