धर्मशाला कसोटीत भारतानं उभारली विजयाची गुढी

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्त्वात भारताने आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'विजयाची गुढी' उभारली आहे. ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचं लक्ष्य भारताने 2 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2017 08:29 PM IST

धर्मशाला कसोटीत भारतानं उभारली विजयाची गुढी

 

28 मार्च :  मराठमोळ्या अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्त्वात भारताने आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'विजयाची गुढी' उभारली आहे. ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचं लक्ष्य भारताने 2 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली. अजिंक्य रहाणे नाबाद आणि लोकेश राहुल नाबाद या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लोकेश राहुलने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही नाबाद अर्धशतकी खेळी केली.

रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार फोर आणि 2 सिक्सर ठोकले. कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची कामगिरी करणार अजिंक्य रहाणे नववा कर्णधार, तर पाचवा मराठमोळा मुंबईकर ठरला आहे.

यापूर्वी उम्रीगर, सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांनी अशी कामगिरी केली होती. तर या कसोटी सामन्यात आणि मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जाडेजाला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...