Home /News /sport /

Yuzvendra Chahal चा कारनामा पाहून पत्नी धनश्री भलतीच खूश, आनंदाने मारु लागली उड्या; Video

Yuzvendra Chahal चा कारनामा पाहून पत्नी धनश्री भलतीच खूश, आनंदाने मारु लागली उड्या; Video

Dhanashree

Dhanashree

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. या विजयात राजस्थानच्या बॉलर्सनी चांगलेच मैदान गाजवले. या सामन्यात स्पिनर युजवेंद्र चहलने मोठा कारनामा केला. सामन्यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या अद्भुत स्पेलनंतर डगआऊटमध्ये बसलेली त्याची पत्नी धनाश्री वर्माा आनंद गगनात मावेना.

पुढे वाचा ...
  मुंबई, 19 एप्रिल: आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. या विजयात राजस्थानच्या बॉलर्सनी चांगलेच मैदान गाजवले. या सामन्यात स्पिनर युजवेंद्र चहलने मोठा कारनामा केला. सामन्यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या अद्भुत स्पेलनंतर डगआऊटमध्ये बसलेली त्याची पत्नी धनाश्री वर्माा आनंद गगनात मावेना. चहल आपल्या कोट्यातील चौथी आणि कोलकाताच्या डावातील 17 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चहलने वेंकटेश अय्यरला विकेटकीपर आणि कॅप्टन संजू सॅमसनच्या हाती स्टंपिग आऊट केलं. त्यानंतर चहलने ओव्हरच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सलग 3 विकेट्स घेत हॅट्रिक घेतली. RR vs KKR: पदार्पणतच घेतली विकेट अन् Obed McCoy ने पुष्पा स्टाईल केले सेलिब्रेशन
  चहलने चौथ्या बॉलवर कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यरला 85 धावावर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यानंतर पुढील बॉलवर त्याने शिवम मावीला झिरोवर कॅच आऊट केलं. रियान परागने मावीचा कॅच घेतला. त्यानंतर आता हॅट्रिक बॉल होता. या हॅट्रिक बॉलवर चहलने आक्रमक फलंदाज पॅट कमिन्सलाही भोपळा फोडू दिला नाही. चहलने फिरकीच्या जाळ्यात पॅटला फसवलं आणि पॅटने विकेटकीपर सॅमसनला कॅच दिला. यासह चहलने अफलातून हॅट्रिक घेतली. हॅट्रिक घेतल्यानंतर चहलच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा होता. ती आनंदाने डगआऊटमध्ये उड्या मारू लागली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चहलने घेतलली हॅट्रिक ही आयपीएलच्या इतिहासातील एकूण 21 वी हॅटट्रिक ठरली. यासह चहल या मोसमात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. राजस्थानच्या विजयात जोस बटलर आणि युझवेंद्र चहल यांनीही मोलाचे योगदान दिले. बटलरने फलंदाजी करताना शतक झळकावत संघाला 200 धावसंख्येचा आकडा पार करण्यात मदत केली. दुसरीकडे, चहलने हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत थेट दुसरे स्थान गाठले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals, Yuzvendra Chahal

  पुढील बातम्या