अखेर पुणेकराची बॅट तळपली! पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे

अखेर पुणेकराची बॅट तळपली! पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे

वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात संधी न मिळालेल्या पुणेकराची अखेर तळपली बॅट.

  • Share this:

रांची, 05 ऑक्टोबर : रांची येथे झालेल्या देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी आणि इंडिया बी यांच्यात अंतिम सामना खेळला गेता. या सामन्यात इंडिया बी संघानं प्रथम फलंदाजी करत 283 धावांपर्यंत मजल मारली. मात्र इंडिया बीनं दिलेल्या आव्हाना पाठलाग करताना इंडिया सीला 50 ओव्हरमध्ये केवळ 232 धावा करता आल्या. या सामन्यात शुबमन गीलनं विराटचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला पण चर्चा झाली ती पुणेकर केदार जाधवची.

वर्ल्ड कप 2019मध्ये टीम इंडियात जागा मिळालेल्या केदाज जाधवला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केदारला टीम इंडियात जागा मिळाली नाही. आता पुन्हा एकदा केदारची बॅट तळपली आहे. देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया बीकडून खेळणाऱ्या केदार जाधवनं दमदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर इंडिया बीनं 283 धावांपर्यंत मजल मारली. केदारनं या सामन्यात 86 धावांची खेळी केली. जाधवच्या या खेळीच्या जोरावर इंडिया सीला 51 धावांनी मात दिली.

विकेटकीपर पार्थिव पटेलच्या संघानं बी संघान टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात 50 ओव्हरमध्ये बी संघानं 7 विकेट गमावक 283 धावा केल्या. बी संघाकडून सलामीच्या फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. पार्थिव पटेल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 28 धावांची खेळी केली. त्यानंतर यशस्वी आणि बाबा अपराजित यांनी सातत्य राखत चांगली भागिदारी केली.

वाचा-दिल्ली प्रदूषणानंतर टीम इंडियावर ‘महा’ चिंता! भारताला गमवावी लागेल मालिका

केदार जाधवनं केली शानदार खेळी

इंडिया बीचा कोलमडणारा डाव केदार जाधवनं सांभळला. केदानं 94 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 86 धावा केल्या. जाधवबरोबर विजय हजारे करंडकमध्ये दुहेरी शतक करणारा यशस्वीनं 79 चेंडूत 54 धावा केल्या. वर्ल्ड कपनंतर एकाही दौऱ्यात संधी न मिळाल्यामुळं केदारसाठी ही खेळी महत्त्वाची ठरू शकते. केदारला ही खेळी टीम इंडियात पुन्हा एकदा जागा मिळवून देऊ शकते.

वाचा-'कार्तिकची ‘चित्त्याची चाल’! कॅचचा VIDEO पाहून तुम्ही धोनीलाही विसराल

शुबमन गीलनं मोडला विराटचा विक्रम

भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गीलची ओळख (Shubamn Gill) भारतीय संघाचे भविष्य म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये शुबमन गील खोऱ्यानं धावा काढत आहे. त्यामुळं त्याला भारतीय कसोटी संघातही जागा मिळाली आहे. दरम्यान आता शुबमन गीलनं एक विक्रमी कामगिरी केली आहे. गीलनं चक्क कर्णधार विराट कोहलीच्या एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. शुबमन गीलकडे देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी संघाचे कर्णधारपद होते. सर्वात कमी वयात देवधर ट्रॉफीमध्ये कर्णधार झालेला गील पहिला खेळाडू आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीनं 2009-10मध्ये 21व्या वर्षी ही कामगिरी केली होती. तर गीलनं 20व्या वर्षी हा पराक्रम केला.

वाचा-नव्या ‘विराट’ पर्वाला सुरुवात, युवा खेळाडूनं मोडला कोहलीचा विक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 07:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading