मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धक्कादायक! कोरोनामुळे भारतीय कर्णधार झाला बेरोजगार, सगळ्यात श्रीमंत BCCI मदत करणार का?

धक्कादायक! कोरोनामुळे भारतीय कर्णधार झाला बेरोजगार, सगळ्यात श्रीमंत BCCI मदत करणार का?

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे, अनेकांना त्यांचे रोजगारही गमवावे लागले आहेत. आता तर भारतातले क्रिकेटपटूही आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे बीसीसीआयला (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंना पैसे द्यायला अडचणी येत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे, अनेकांना त्यांचे रोजगारही गमवावे लागले आहेत. आता तर भारतातले क्रिकेटपटूही आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे बीसीसीआयला (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंना पैसे द्यायला अडचणी येत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे, अनेकांना त्यांचे रोजगारही गमवावे लागले आहेत. आता तर भारतातले क्रिकेटपटूही आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे बीसीसीआयला (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंना पैसे द्यायला अडचणी येत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 2 जून : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे, अनेकांना त्यांचे रोजगारही गमवावे लागले आहेत. आता तर भारतातले क्रिकेटपटूही आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे बीसीसीआयला (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंना पैसे द्यायला अडचणी येत आहेत. अनुभवी खेळाडू जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat), शेल्डन जॅकसन (Sheldon Jackson) आणि हरप्रीत सिंग भाटिया (Harpreet Singh Bhatia) यांनी बीसीसीआयकडे टीम इंडियाच्या खेळाडूंप्रमाणेच स्थानिक क्रिकेटपटूंनाही करारबद्ध करा अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहन गावसकर (Rohan Gavaskar) यानेही राज्य संघांना अशाचप्रकारे पत्र लिहिलं होतं. बहुतेक स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, तसंच त्यांच्याकडे नोकरीही नसते, त्यामुळे त्यांना उपजिवीकेसाठी मॅच फीवरच अवलंबून राहावं लागतं. कोरोना व्हायरसमुळे रणजी ट्रॉफीचं मागचं सत्र रद्द करण्यात आलं, त्यामुळे अशा क्रिकेटपटूंच्या कमाईवरही खूप परिणाम झाला. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट याला कराराच्या सुरक्षेची गरज नाही, पण राज्यांच्या 30 खेळाडूंसोबत करार झाला पाहिजे, असं त्याला वाटत आहे. सौराष्ट्रला आपल्या नेतृत्वात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकवलेला उनाडकट पीटीआयशी बोलत होता. 'कोरोनाच्या आधीपासूनच कराराबाबत बोललं जात होतं. एवढच नाही तर आयु वर्गाच्या खेळाडूंना क्रिकेट खेळलं जात नसल्यामुळे भरपाई मिळाली पाहिजे. तुम्ही सगळ्यांना करारबद्ध करू शकत नाही, पण तुम्ही 30 खेळाडूंशी करार करू शकता,' असं जयदेव उनाडकट म्हणाला. एका मोसमामध्ये स्थानिक खेळाडू 15-16 लाख रुपयांची कमाई करतो, पण मागच्यावर्षी असं झालं नाही, कारण 87 वर्षात पहिल्यांदा रणजी ट्रॉफी रद्द करण्यात आली. छत्तीसगडचा कर्णधार हरप्रीत सिंग भाटिया याला नोकरी नाही, त्यामुळे त्याला पैसा कमवण्यासाठी इंग्लंडला जावं लागलं. 2017 पासून हरप्रीत इंग्लंडमध्ये बार्न्सले वुली मायनर्स या क्लबकडून क्रिकेट खेळतो. 'मागच्या सत्रात फक्त 10 सामने झाले, माझ्यासाठी या मॅच खूप कमी होत्या, त्यामुळे मला पैसे कमावण्यासाठी इंग्लंडला यावं लागलं. भारतामध्ये मला नोकरी नाही, त्यामुळे मला इंग्लंडमध्ये येण्याशिवाय पर्याय नव्हता,' असं हरप्रीत म्हणाला. 'जर भारतामध्ये माझ्यासोबत करार झाला असता, तर मला इंग्लंडमध्ये यावं लागलं नसतं. बीसीसीआयने याआधी मदत केली आणि या कठीण काळातही ते आमची मदत करतील, अशी अपेक्षा आहे. लवकरच राज्य संघांकडून आम्हाला करारबद्ध केलं जावं,' अशी प्रतिक्रिया हरप्रीतने दिली. हरप्रीत सप्टेंबर महिन्यापर्यंत इंग्लंडमध्ये राहणार आहे. 'आम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करून योजना बनवावी लागेल, कारण बहुतेक खेळाडू आयपीएल खेळत नाहीत, तसंच त्यांच्याकडे नोकऱ्याही नाहीत. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर तो पूर्ण सत्र खेळू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये करार महत्त्वाचा ठरतो,' असं वक्तव्य हरप्रीतने केलं. आयपीएलच्या (IPL 2021) या मोसमात कोलकात्याच्या टीममध्ये असणारा शेल्डन जॅकसन याने महिला क्रिकेटपटूंनाही करारबद्ध करावं, अशी मागणी केली आहे. करार केल्यामुळे खेळाडूंना सुरक्षित वाटेल, या परिस्थितीमध्ये आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो, एवढा आधार तरी खेळाडूंना मिळेल, असं जॅकसन म्हणाला. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी पहिलेच सांगितलं आहे, की बोर्ड राज्य संघासोबत खेळाडूंना आर्थिक मदत देण्यासाठी योजना आखत आहे. 29 मे रोजी झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. भारतातलं स्थानिक क्रिकेट सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतं, पण देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर या गोष्टी अवलंबून आहेत.
First published:

Tags: BCCI, Coronavirus, Cricket news

पुढील बातम्या