S M L

दिल्ली हायकोर्टाने प्रफुल्ल पटेलांना फूटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवलं

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'एआयएफएफ' अर्थात राष्ट्रीय फूटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेत. प्रफुल्ल पटेल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय फूटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवड प्रक्रियेत राष्ट्रीय क्रीडा संहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत याचिकाकर्ता राहुल मेहरा हायकोर्टात गेले होते.

Chandrakant Funde | Updated On: Oct 31, 2017 11:05 PM IST

दिल्ली हायकोर्टाने प्रफुल्ल पटेलांना फूटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवलं

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'एआयएफएफ' अर्थात अखिल भारतीय फूटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेत. प्रफुल्ल पटेल यांची सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय फूटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवड प्रक्रियेत राष्ट्रीय क्रीडा संहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत याचिकाकर्ता राहुल मेहरा हायकोर्टात गेले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रफुल्ल पटेल यांना पदावरून हटवण्याचे आदेश देण्यात आलेत.

गेल्यावर्षीच प्रफुल्ल पटेल यांची या पदावर निवड झाली होती. पटेल यांचा कार्यकाल 2020 पर्यंत होता पण त्याआधीच दिल्ली हायकोर्टाने ही निवडप्रक्रियाच रद्दबातल ठरवलीय. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालीच 'एआयएफएफ'ने 'फीफा अंडर -17 विश्व कप'चं यशस्वी आयोजन केलं होतं. प्रफुल्ल पटेल 2008 साली फूटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. तेव्हापासून हे पद त्यांच्याकडेच होतं. त्याच्यापूर्वी प्रियरंजन दासमुन्शी हे फूटबॉल महासघाचे अध्यक्षपद सांभाळत होते पण 2008साली त्यांची ह्रदयविकाराने निधन झाल्यानं प्रफुल्ल पटेल यांच्या या पदावर वर्णी लागली होती.

दरम्यान, दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाबद्दल 'एआयएफएफ'ने आत्ताच प्रतिक्रिया देणं टाळलंय. हायकोर्टाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असं  अखिल भारतीय फूटबॉल महासंघाने म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 10:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close