नवी दिल्ली, 11 जून : ICC Cricket World Cup सुरु होऊन दोन आठवडे झाले असताना, भारतानं दोन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळं भारतीय क्रिकट चाहते सध्या जोशात आहेत. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने क्रिकेट चाहच्यांना मोठा धक्का दिला आहे. उच्च न्यायालयाने वर्ल्ड कप दाखवणाऱ्या 60 वेबसाईट, 14 रेडिओ चॅनल आणि 30 इंटरनेट सर्विसवर बंदी घालण्यात आली आहे. यात लाईव्ह सामना दाखणाऱ्या वेबसाईटही बंद करण्यात आल्या आहेत. न्यायाधीश जे.आर. मिधा यांनी हे आदेश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने हे आदेश चॅनल-2 ग्रुपच्या अपीलवर करण्यात आला होते. चॅनल-2 समूहाचे वकिल जयंत मेहता आणि सुभालक्ष्मी सेन यांनी उच्च न्यायालयाला, काही प्लॅटफॉर्म हे चॅनल-2चे अधिकृत प्लॅटफॉर्म नाही आहेत, तसेच त्यांना वर्ल्ड कप सामने दाखवण्याचा परवानाही देण्यात आलेला नाही. म्हणूनच या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
सध्या केवळ चॅनल-2 ग्रुप यांच्याकडेच केवळ वर्ल्ड कपचे सामने दाखवण्याचा अधिकार आहे. चॅनल-2 समूह आयसीसीच्या व्यवसायिक कॉरपोरेशन सोबत ऑडिओ अधिकारांचाही समावेश आहे. त्यामुळं ज्या बेवसाईटकडे अधिकारच नाही, त्यांना वर्ल्ड कप सामने दाखवू नये अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली होती.
यावर न्यायालयाने, 4 सप्टेंबरपर्यंत इतर ग्रुपनी उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. तुर्तास 60 वेबसाईट, 14 रेडिओ चॅनल आणि 30 इंटरनेट सर्विसवर बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान भारतात वर्ल्ड कप सामन्याचे प्रसारण हे मोबाईवर हॉट स्टारच्या माध्यमातून केले जाते तर, अमेरिकेत विलो टिव्ही करते. तसेच, लाईव्ह मॅच स्टार स्पोर्टसवर पाहू शकता. दरम्यान भारताचा पुढील सामना गुरुवारी न्यूझीलंड विरोधात होणार आहे.
वाचा-विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार?
वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर
वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट
पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा