युवराजची अर्धशतकी खेळी वाया,दिल्लीचा हैदराबादवर विजय

युवराजची अर्धशतकी खेळी वाया,दिल्लीचा हैदराबादवर विजय

हैदाराबादने पहिली बॅटिंग करत 185 रन्सचं टार्गेट दिलं होतं. परंतु, दिल्लीने 189 रन्स करत मॅच खिश्यात घातली.

  • Share this:

02 मे : दिल्ली डेअरडेव्हिल्सने आॅलराऊंडर परफाॅर्मन्सच्या बळावर सनराइजर्स हैदराबादचा 6 विकेटने पराभव केला. हैदाराबादने पहिली बॅटिंग करत 185 रन्सचं टार्गेट दिलं होतं. परंतु, दिल्लीने 189 रन्स करत मॅच खिश्यात घातली.

दिल्लीच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादच्या टीमचा टिकाव लागला नाही. त्यामुळे ओपनिंग फळी झटपट बाद झाली. पण त्यानंतर करुण नायर 39, रिषभ पंत 34, श्रेयस अय्यर 33 आणि कोरी एंडरसन यांनी संयमी खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

तर दुसरीकडे युवराज सिंगची अर्धशतकी खेळी वाया गेली. त्याने 41 बाॅल्समध्ये शानदार 70 रन्स केले. तर युवराज आणि आॅनरिके यांनी चौथ्या विकेटसाठी 92 रन्सची पार्टनशीप केली. या बळावर हैदराबादने 185 रन्सचा स्कोअऱ उभारला. पण दिल्लीने एकीचे बळ दाखवत आयपीएलच्या सीझनमधला तिसरा विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 12:00 AM IST

ताज्या बातम्या