Home /News /sport /

हैदराबाद सनरायझर्सचा दिल्लीवर शानदार विजय

हैदराबाद सनरायझर्सचा दिल्लीवर शानदार विजय

अटीतटीच्या लढतीत हैदराबाद सनरायझर्सने 15 रन्सने विजय मिळवला.

  20 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या सीझनच्या 21 व्या मॅचमध्ये हैदराबाद सनरायझर्सने दिल्ली डेअरडेव्हिलसला पराभूत केलं. अटीतटीच्या लढतीत हैदराबाद सनरायझर्सने 15 रन्सने विजय मिळवला. टाॅस जिंकून पहिली बॅटिंग करणाऱ्या सनरायझर्सची खराब सुरुवात झाली. कॅप्टन डेव्हिड वॅार्नर स्वस्तात आऊट झाला. त्यानंतर केन विल्यमसने तडाखेबाज बॅटिंग करत स्कोअर उभारला, 51 बाॅलमध्ये त्याने 89 रन्सची शानदार इनिंग खेळली. यात त्याने पाच सिक्स लगावले तर सहा चौकार ठोकले. तर दुसऱ्याबाजून शिखर धवनने चांगली साथ दिली. धवन 70 रन्सवर आऊट झाला. युवराज सिंग 3 रन्सवर क्लीनबोल्ड झाला. अखेरच्या ओव्हमध्ये हेन्रीकस आणि हुडाने तडाखेबाज फलंदाजी करत 191 धावांचा डोंगर गाठला. 192 रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. बिलिंग्ज ९ रन्सवर आऊट झाला. संजू सॅमसन ३३ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर श्रेयश अय्यरने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पण सनरायझर्सच्या माऱ्यापुढे दिल्ली टीम 176 रन्सवर गारद झाली.
First published:

Tags: Delhi Daredevils, Sunrisers hyderabad, दिल्ली डेअर डेव्हिलस, हैदराबाद सनरायझर्स

पुढील बातम्या