भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर बंदी, KKRच्या दोन खेळाडूंवरही होणार कारवाई

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर बंदी, KKRच्या दोन खेळाडूंवरही होणार कारवाई

टीम इंडियाच्या तीन खेळाडूंच्या अडचणी वाढल्या, केला मोठा गुन्हा.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : गेल्या वर्षी भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देणारा फलंदाज मनजोत कालरावर बंदी घालण्यात आली आहे. मनजोतला वयाच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळं मनजोतवर दोन वर्षासाठी बंदी लावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्ली क्रिकेट लोकपालने त्यांच्यावर ही बंदी घातली आहे. त्याचबरोबर युवा खेळाडू शिवम मावीवरही कारवाई होऊ शकते. वयाची फसवणूक प्रकरणात त्याचे प्रकरण बीसीसीआयकडे पाठविण्यात आले आहे.

गेल्या वर्षी अंडर-16 वर्ल्ड कप स्पर्धेत मनजोत कालरा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याने अंतिम सामन्यात शतकी कामगिरी केली होती. यावर्षी जूनमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने कालराच्या पालकांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले.

मनजोतवर असा आरोप लगावण्यात आला आहे की ज्युनिअर क्रिकेट खेळण्यासाठी त्यानं आपली जन्मतारिख 1999 सांगितली होती. रिपोर्टनुसार कालराची वास्तविक जन्मतारीख 15 जानेवारी 1998 आहे. परंतु जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा मनजोत अल्पवयीन असल्यामुळं एफआयआर दाखव करण्यात आला नव्हता. मात्र आता त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दोन खेळाडूही संकटात

सध्या अंडर-19 संघात सामिल असलेल्या शिवम मावीवरही बंदीची टांगती तलवार आहे. मावीला टीम इंडियाचे भविष्य मानले जाते. परंतु वयातील फसवणूकीत अडकल्यानंतर त्यांला मोठा धक्का बसू शकतो. 21 वर्षीय शिवम मावीने सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 115 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट घेतल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 सामन्यात 74 धावा करत 22 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 9 टी -20 सामन्यात 13 धावा घेऊन पाच विकेटही घेतल्या. त्याचवेळी वयाच्या घोटाळ्याच्या प्रकरणात केकेआरचे अन्य खेळाडू नितीश राणादेखील पकडले गेले आहेत. या खेळाडूला त्याच्या जन्मतारीख संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर ती चूक आढळली तर नितीश राणाविरोधात कारवाई होऊ शकते.

Published by: Priyanka Gawde
First published: December 30, 2019, 6:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading