IPL 2019 : धोनीच्या चेन्नईकडून दिल्लीचा धुव्वा, 6 विकेट्स राखून दणदणीत विजय

फिरोज शाहा कोटला मैदानावरही गाजला धोनीचाच नाद, सहा विकेट राखून दिल्लीवर विजय.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 11:48 PM IST

IPL 2019 : धोनीच्या चेन्नईकडून दिल्लीचा धुव्वा, 6 विकेट्स राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली, 26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई यांच्यातला सामना रंगतदार होणार अशी अपेक्षा असताना, चेन्नईच्या थालानं म्हणजेच कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईला 6 विकेट राखत सामना जिंकून दिला.

दिल्लीकडून धवन वगळता दिल्लीचा एकाही फलंदाजाली चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे दिल्लीला केवळ 147 धावा करता आल्या. 148 धावांचा पाठलाग करत असताना, चेन्नईची सुरुवात काहिशी डळमळीत झाली. चेन्नई संघाचा स्टार सलामीवीर अंबातू रायडू केवळ 5 धावा करत बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैनानं चांगली फलंदाजी केली. वॉटसन 44 तर, रैना 30 धावा करुन बाद झाला. चेन्नईचा हा 150वा आयपीएल विजय आहे.
Loading...


मुंबई विरुद्धच्या सामन्यात तुफानी फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतचं वादळही यावेळी शमलेलं होत. तर, युवा खेळाडू पृथ्वी शॉलाही विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. तर, चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट घेत, दिल्लीच्या फलंदाजांना मैदानात जास्त काळ टिकू दिले नाही. या सामन्यादरम्यान, रिषभ पंत हा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला तर, इमरान ताहीरला पर्पल कॅप बहाल करण्यात आली. तर, अंकतालिकेत सध्या चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.
VIDEO : ...जेव्हा नवनीत राणा बैलगाडीतून जाऊन भरतात उमेदवारी अर्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...