टीम इंडियाची धाकधुक वाढली, टी-20 सामन्यावर चक्क वायू प्रदुषणाचं संकट

टीम इंडियाची धाकधुक वाढली, टी-20 सामन्यावर चक्क वायू प्रदुषणाचं संकट

दिवाळी आणि वायू प्रदुषणाचा भारतीय संघाला बसणार फटका.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन नोव्हेंबरपासून अरुण जेटली मैदानावर पहिला टी-20 सामना होणार आहे. मात्र राजधानीत होणाऱ्या या सामन्यावर संकंट आहे ते वायू प्रदुषणाचे. दिल्लीतील वाढते प्रदुषण चिंतेचा विषय झाला आहे. त्यातच दिवाळीमुळं दिल्लीची हवा आणखी दुषित झाली आहे. त्यामुळं भारत-बांगलादेश मालिकेवरही प्रदुषणाचे संकंट आहे. याआधी 2017मध्ये श्रीलंका संघाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंना मास्क घालून सामना खेळावा लागला होता. तर काही खेळाडू प्रदुषणामुळे आजारीही पडले होते.

दिल्लीमधील वायू गुणवत्ता खराब असल्यामुळं भारत-बांगलादेश यांच्यातील सामना अडचणीत आला आहे. दिवाळीच्या आधी आणि नंतर एक्यआईच्या (air quality index) आकड्यांनुसार 0-50 खुप चांगली, 51-100 चांगली, 101-200 मध्यम, 201-300 खराब, 300-400 खुप खराब आणि 400च्या वर गंभीर अशी विभागणी करण्यात आली आहे. यानुसार दिल्लीमधली हवा सध्या 357 म्हणजेच खुप खराब आहे.

त्यामुळं खेळाडूंच्या आरोग्यावर या हवेचा परिणाम होऊ शकतो. बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट बोर्ड यांनी याबाबत, “वायु प्रदुषण आमच्या हातात नाही. अपेक्षा आहे की सामन्याआधी हवा शुध्द होईल किंवा प्रदुषण कमी होईल. दिवाळीनंतर सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल”, असे सांगितले.

दिवाळीनंतर सामन्याबाबत होणार निर्णय

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “दिवाळीनंतर पुन्हा एकदा आकड्यांची पाहणी केली जाईल. दरम्यान दिवाळीनंतर आठवड्याच्या कालावधीनंतर सामना होणार असल्यामुळं खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. बांगलादेश विरोधात पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली), दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट), तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर) येथे होणार. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये होणार सामना दुसऱ्या ठिकाणी आयोजित केला जाऊ शकतो.

2007मध्ये श्रीलंका संघाला दिल्लीमध्ये वापरावा लागला होता मास्क

2007मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात त्रास सहन करावा लागला होता. श्रीलंका संघानं हा सामना तोंडाला मास्क बांधून हा सामना खेळला. त्यामुळं हीच चूक पुन्हा होणार नाही यासाठी बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट बोर्ड चर्चा करणार आहे. त्यामुळं जर सामन्यादरम्यान प्रदुषण असेल तर बांगलादेशच्या संघालाही मास्क बांधून खेळावे लागेल.

First published: October 28, 2019, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading