दीप्ती शर्मा आणि पुनम राऊतने महिला क्रिकेटमध्ये रचला इतिहास

दीप्ती शर्मा आणि पुनम राऊतने महिला क्रिकेटमध्ये रचला इतिहास

भारतीय क्रिकेट टीमच्या दीप्ती शर्मा आणि पुनम राऊत यांनी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात320 रन्सची पार्टनरशिप केली

  • Share this:

15 मे : जागतिक महिला क्रिकेटमध्ये पहिली 300 रन्सची पार्टनरशिप करत भारतीय महिल टीमच्या  दीप्ती शर्मा आणि पुनम राऊतने इतिहास रचलाय.

भारतीय क्रिकेट टीमच्या दीप्ती शर्मा आणि पुनम राऊत यांनी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात320 रन्सची पार्टनरशिप केली. दीप्ती शर्माने 188 रन्स केले. तर पूनम राऊतनी 109 रन्स केले आहेत. एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये ही पहिलीच 300 रन्सची पार्टनरशिप आहे.

व्यक्तिगत पातळीवर याआधी आॅस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने 1997 मध्ये डेन्मार्कच्या विरुद्ध सर्वाधिक 229 रन्सचा रेकाॅर्ड केलाय. तर भारताकडून आतापर्यंत जया शर्मा हिने सर्वाधिक नाबाद 138 रन्सचा रेकाॅर्ड पाकिस्तानच्या विरुद्ध केलाय.

तर भागिदारीमध्ये भारताकडून आतापर्यंत रेशमा गांधी आणि मिताली राज यांच्या नावे रेकाॅर्ड आहे. या जोडीने 1999 मध्ये आयरलँडच्या विरुद्ध 258 रन्सची भागिदारी केली होती.

First published: May 15, 2017, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading