मुंबई, 13 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रत्येक खेळाडू जीवापाड मेहनत करताना दिसत आहे, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपक काब्रा (Deepak Kabra) यांची टोकयो ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिक (Gymnastics) सामन्यांसाठी जज म्हणून निवड झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिक प्रकारात जज म्हणून सहभागी होणारे दीपक काब्रा हे पहिले भारतीय आहेत. भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा करमाकरने (Deepa Karmakar) तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. 'ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिक्ससाठीचे पहिले भारतीय जज म्हणून निवड झाली आहे. दीपक काबरा यांचं अभिनंदन,' असं दीपाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
First Indian ever to get selected to Judge Gymnastics at an Olympic Games! 👏 Congratulations Deepak Kabra bhaiya for this wonderful accomplishment and best wishes for #Tokyo2020 pic.twitter.com/niK2H5kgAF
— Dipa Karmakar (@DipaKarmakar) July 11, 2021
मुंबईकर असलेल्या दीपक काब्रा यांची 2019 साली आशियाई जिमनॅस्टिक संघाच्या तांत्रिक समितीमध्ये निवड झाली होती. 2019 आशियाई चॅम्पियनशीपमध्ये ते वरिष्ठ परिक्षक होते. याआधी राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे (National Rifle Association) सह सचिव पवन सिंग (Pawan Singh) यांची टोकयो ऑलिम्पिकमध्ये जज म्हणून निवड झाली होती.
दीपक काब्रा यांच्याप्रमाणेच पवन सिंगदेखील ऑलिम्पिकमध्ये शूटिंगसाठी परिक्षण करणारे पहिले भारतीय असतील.
Tokyo Olympic : बस ड्रायव्हरच्या मुलीला ऑलिम्पिकचं तिकीट, स्वप्न भारतासाठी मेडल जिंकण्याचं!
जिमनॅस्टिक प्रकारात प्रणती नायक ही एकमेव भारतीय टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करेल. 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत प्रणती भारताची एकमेव महिला जिमनॅस्ट आहे. प्रणतीने उलानबटारमध्ये आयोजित 2019 आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. कोरोना व्हायरसमुळे नवीनतम आशियाई चॅम्पियनशीपला रद्द करण्यात आलं होतं, त्यामुळे 2019 चॅम्पियनशीपच्या आधारावर टोकयो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना कोटा देण्यात आला. प्रणती नायकने आशियाई उपखंडाचा कोटा मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021