मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: दीप्ती शर्माची कॉपी करायला थांबला दीपक चहर, पुढे काय झालं? पाहा VIDEO

Ind vs SA T20: दीप्ती शर्माची कॉपी करायला थांबला दीपक चहर, पुढे काय झालं? पाहा VIDEO

दीपक चहर

दीपक चहर

Ind vs SA T20: नॉन स्ट्रायकर एन्डवर असलेला स्टब्स बॉल टाकण्याअगोदरच क्रीझच्या पुढे गेला. नेमकं त्याचवेळी दीपक चहरनं थांबून मंकडिंगचा प्रयत्न केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

इंदूर, 4 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या तिसऱ्या टी20तही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धावांची पुन्हा लयलूट केली. दक्षिण आफ्रिकेनं भारतीय बॉलर्सवर आक्रमण करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 रन्स स्कोअर बोर्डवर लावल्या. क्विंटन डी कॉक आणि रायली रुसोच्या दमदार फलंदाजीनं दक्षिण आफ्रिकेला धावांचा हा मोठा डोंगर उभारुन दिला. पण दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान मैदानात असं काही घडलं की सगळेच जण पाहत राहिले. आणि अनेकांना काही दिवसांपूर्वीच्या लॉर्ड्स वन डेची आठवण झाली.

दीपक चहरचा मंकडिंगचा प्रयत्न

16 व्या ओव्हरमध्ये दीपक चहर बॉलिंगसाठी आला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं 15 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या होत्या. ओव्हरच्या पहिलाच बॉल टाकण्यासाठी दीपच चहर बॉलिंग मार्कवर आला. त्याचवेळी नॉन स्ट्रायकर एन्डवर असलेला स्टब्स बॉल टाकण्याअगोदरच क्रीझच्या पुढे गेला. नेमकं त्याचवेळी दीपक चहरनं थांबून मंकडिंगचा प्रयत्न केला. पण त्यानं बेल्स उडवल्या नाहीत आणि अशा प्रकारे स्टब्सला वॉर्निंग दिली. यावेळी रोहितच्या चेहऱ्यावर मात्र हसू होतं.

आठवला लॉर्ड्स वन डेतला तो किस्सा

दीपक चहरच्या या कृतीनंतर अनेकांना काही दिवसांपूर्वी भारत आणि इंग्लंड महिला संघातला तो लॉर्ड्सवरचा सामना आठवला. भारताच्या दिप्ती शर्मानं नॉन स्ट्राईक एन्डला इंग्लंडच्या बॅट्समनला रन आऊट केलं आणि सामना भारताला जिंकून दिला. पण त्यावर सोशल मीडियासह क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली. पण तो रन आऊट नियमाला धरुन असल्याचं नंतर एमसीसीनंही जाहीर केलं होतं.

रुसोचं शतक, दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर

दरम्यान रायली रुसोच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर 228 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. रुसोनं टी20 कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकताना नाबाद 100 धावा केल्या. त्यानं आपलं शतक अवघ्या 48 बॉल्समध्ये 7 फोर आणि 8 सिक्सर्सच्या मदतीनं पूर्ण केलं. याशिवाय क्विटन डी कॉकनं 68 धावांचं योगदान दिलं.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 cricket