मुंबई, 03 डिसेंबर : भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर असून न्यूझीलंडहून खेळाडू थेट ढाक्यात पोहोचले आहेत. दरम्यान, मलेशियाई एअरलाइन्समधून येताना आपल्याला वाईट अनुभव आल्याचं म्हणत भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने संताप व्यक्त केला आहे. त्याने म्हटलं की, एअरलाइन्सने लगेज हरवले असून बिझनेस क्लासमधून प्रवास केल्यानतंरही आम्हाला जेवण देण्यात आलं नाही. बांगलादेशविरुद्ध रविवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.
दीपक चाहरने शनिवारी सकाळी संघाच्या सराव सत्राच्या आधी ट्विट केलं की, मलेशियाई एअरलाइन्समधून प्रवासाचा अनुभव अत्यंत वाईट असा होता. सुरुवातीला त्यांनी आमचे विमान अचानक बदलले आणि आम्हाला त्याची पूर्वकल्पनाही दिली नाही. त्यानतंर बिझनेस क्लासमध्ये असूनही जेवण दिलं गेलं नाही. आता आम्ही गेल्या 24 तासांपासून आमच्या लगेजसाठी वाट पाहतोय. अशा परिस्थितीत उद्या आम्हाला सामना खेळायचा आहे.
हेही वाचा : 'तो भीतीदायक क्षण', रुग्णालयातून परतल्यानंतर पाँटिंगने प्रकृतीबद्दल दिली माहिती
न्यूझीलंडमध्ये मालिका संपल्यानंतर दीपक चाहर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, शिखर धवन, शुभमन गिल आणि वॉशिंट्गन सुंदर हे ख्राइस्टचर्चहून क्वाललांपूरवरून ढाक्यात पोहोचले आहेत. सूर्यकुमार यादव आणि उम्रान मलिक भारतात पोहोचले आहेत. आता उम्रान मलिकला पुन्हा बांगलादेशला जावं लागेल. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानं मलिकचा समावेश संघात करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणेकर खेळाडू होणार धोनीचा वारसदार! CSK कॅम्पमधून आली मोठी बातमी
मलेशिया एअरलाइन्सने दीपक चाहरला तक्रार दाखल करण्यासाठी लिंक पाठवली. मात्र, चाहरने म्हटलं की, ही लिंक ओपन होत नाहीय. मलिशिया एअरलाइन्सने यावरही उत्तर दिलं असून त्यांनी म्हटलं की, हवामान संबंधी आणि तांत्रिक कारणांमुळे असं असू शकतं. तुम्हाला झालेल्या त्रासासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket, Team india