क्रिकेटमध्ये आलं ‘चाहर’ नावाचं वादळ! हॅट्रिकनंतर आणखी एक जबरदस्त कामगिरी

क्रिकेटमध्ये आलं ‘चाहर’ नावाचं वादळ! हॅट्रिकनंतर आणखी एक जबरदस्त कामगिरी

चाहरनं घातलाय राडा! 4 दिवसात घेतल्या 12 विकेट.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 14 नोव्हेंबर : टीम इंडियाचा जलद गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) सध्या खतरनाक गोलंदाजी करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरोबरच प्रथम श्रेणी स्पर्धांमध्येही दीपक शानदार कामगिरी करत आहे. आपल्या अचूक लाईन आणि लेंथसाठी ओळखला जाणाऱ्या चाहरनं बांगलादेश विरोधात टी-20मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रमाची नोंद केली.

सध्या राजस्थानकडून सैयद मुश्ताक अली ट्रॉफी खेळणाऱ्या चाहरनं या स्पर्धेतही फलंदाजांची झोप उडवली आहे. तिरुवनंतरपुरममध्ये झालेल्या सामन्यात चाहरनं 4 ओव्हरमध्ये 46 धावा देत तीन विकेट घेतल्या. चाहरच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थाननं या सामन्यात विजय मिळवला.

4 चेंडूत घेतल्या 3 विकेट

उत्तर प्रदेश विरोधात झालेल्या सामन्यात चाहरनं आपल्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये जास्त धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूत युपीच्या 3 फलंदाजांना बाद केले. चाहरनं 20व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर मोहसिन खान, तिसऱ्या चेंडूवर शानू सैनी आणि चौथ्या चेंडूवर शुभम चौबेला बाद केले. चाहरच्या या कामगिरीमुळं युपी संघाला 20 ओव्हरमध्ये 164 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर हे आव्हान राजस्थान संघानं 16 चेंडू शिल्क ठेवत पार केले. यात रवि बिश्रोईनं 43 चेंडूत 87 धावांची खेळी केली.

वाचा-'ती' हॅट्रिक नव्हतीच, BCCI आणि ICCनं केली माती!

डेथ ओव्हर किंग आहे चाहर

गेल्या तीन सामन्यात दीपक शेवटच्या ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. बांगलादेश विरोधात झालेल्या टी-20 सामन्यातही चाहरनं शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेण्याची विक्रमी कामगिरी केली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेश विरोधातही शेवटच्या ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या.

वाचा-4 दिवस, 3 गोलंदाज आणि 4 हॅट्रिक! एका क्लिकवर पाहा क्रिकेटमधले हे सुवर्णक्षण

धोनीनं दिलेल्या त्या अश्रूंमुळे चाहर झाला जबरदस्त गोलंदाज

दीपक चाहरच्या (Deepak Chahar) करिअरला कलाटणी मिळाली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळं. दीपक चाहरच्या प्रथम श्रेणीमधील कामगिरीच्या जोरावर त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघात स्थान मिळाले. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये धोनीनं मुख्य गोलंदाजाप्रमाणे चाहरला संधी दिल्या. हंगामाच्या सुरुवातीला धोनीनं फक्त त्याला सुरुवातीचे चार ओव्हर दिले, त्यानंतर डेथ ओव्हरमध्येही गोलंदाजी दिली. अशाच एका सामन्यात डेथ ओव्हरमध्ये खराब गोलंदाजी केल्यामुळं धोनीनं भरमैदानात चाहरला सुनावले होते. चाहरनं शेवटच्या ओव्हरमध्ये फुलटॉस आणि नो बॉल टाकला होता. त्यावर धोनीनं नाराजी व्यक्त केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वाचा-असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक

त्या प्रसंगानंतर चाहर झाला डेथ ओव्हर मास्टर

धोनीनं नाराजी व्यक्त केल्यानंतरच चाहरचे करिअर बदलले. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट घेणारा चाहर डेथ ओव्हरमध्येही कमालीची गोलंदाजी करू लागला. त्यामुळं अशीच कामगिरी चाहरनं बांगलादेश विरोधातही केली. चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्ट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला.

First published: November 14, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading