Home /News /sport /

Deepak Chahar Marriage : 'हनीमूनला पाठीकडे लक्ष दे, वर्ल्ड कप तोंडावर', बहिणीच्या सल्ल्याने दीपक चहर क्लीन बोल्ड!

Deepak Chahar Marriage : 'हनीमूनला पाठीकडे लक्ष दे, वर्ल्ड कप तोंडावर', बहिणीच्या सल्ल्याने दीपक चहर क्लीन बोल्ड!

टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar Marriage) याचं बुधवारी आग्र्यामध्ये जया भारद्वाजसोबत (Jaya Bharadwaj) लग्न झालं. दीपकचा चुलत भाऊ लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) आणि बहिण मालती चाहरने (Malti Chahar) डान्स केला.

    मुंबई, 3 जून : टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar Marriage) याचं बुधवारी आग्र्यामध्ये जया भारद्वाजसोबत (Jaya Bharadwaj) लग्न झालं. आग्र्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दीपक आणि जया यांनी सात फेरे घेतले. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली, तसंच दोघांच्या लग्नाचे फोटोही बरेच व्हायरल झाले. दीपकचा चुलत भाऊ लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) आणि बहिण मालती चाहरने (Malti Chahar) डान्स केला, त्याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. दीपक आणि जया बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आयपीएल 2021 मध्ये दीपकने स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये जाऊन जया भारद्वाजला प्रपोज केलं होतं. दीपक चहरची बहिण मालती चहरली सोशल मीडियावर बरीच ऍक्टीव्ह असते. लग्नामध्येही ती सुंदर दिसत होती. लग्न झाल्यानंतर आता मालतीने सोशल मीडियावरून दीपक चहरला शुभेच्छा दिल्या आहेत, पण या शुभेच्छा देताना तिने दीपकला पाठीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. मालतीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. 'आता मुलगी आमची झाली. तुम्हाला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा. दीपक चहर प्लीज हनीमूनला पाठीवर लक्ष दे, वर्ल्ड कप जवळ आहे,' असं मालती म्हणाली.
    पाठीच्या दुखापतीमुळेच दीपक चहरला आयपीएल 2022 मध्ये खेळता आलं नाही. सीएसकेने दीपकला 14 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. पाठीची दुखापत पूर्ण बरी झाली नाही, त्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठीही टीम इंडियात निवड झाली नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपपर्यंत फिट व्हायचा प्रयत्न दीपक चहर करत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या