मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार?

हार्दिक-कृणाल नाही, तर हे दोन भाऊ टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कप खेळणार?

आयपीएल (IPL 2021) मध्ये पांड्या बंधूंनी (Pandya Brothers) संघर्ष केला, पण दुसरीकडे दोन भावांनी धमाका करत टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीला विचार करायला भाग पाडलं आहे. दीपक चहर (Deepak Chahar) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या दोन बंधूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 मे : आयपीएलमध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना धमाकेदार कामगिरी करत हार्दिक आणि कृणाल (Pandya Brothers) या बंधूंनी टीम इंडियामध्ये प्रवेश केला. भारताकडून खेळतानाही दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली, पण गेल्या काही महिन्यांमध्ये हार्दिकला (Hardik Pandya) दुखापतींनी ग्रासलं आहे, तर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे या दोघांची आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड होणार का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे पांड्या बंधूंचा खराब काळ सुरू असला तरी चहर बंधूंनी मात्र यंदाची आयपीएल गाजवली. चुलत भाऊ असलेल्या दीपक चहर (Deepak Chahar) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांनी आयपीएलच्या या मोसमात चमकदार कामगिरी केली, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी या दोन भावांचा विचार होऊ शकतो.

चेन्नई सुपरकिंग्सचा फास्ट बॉलर दीपक चहरला आयपीएलच्या 8 पैकी 6 सामन्यांमध्ये विकेट घेता आली नाही, पण दोन सामन्यांमध्येच त्याने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. या 8 विकेटपैकी दीपक चहरने 7 विकेट पॉवरप्लेमध्ये घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट 8.04 असला तरी त्याने स्विंग बॉलिंगने अनेक दिग्गजांना त्रास दिला. इयन मॉर्गन, मयंक अग्रवाल आणि क्रिस गेल या मोठ्या खेळाडूंची विकेट दीपक चहरने घेतली.

टीम इंडियाचा स्विंग बॉलर भुवनेश्वर कुमार हा गेल्या काही काळापासून दुखापतग्रस्त होत आहे, त्यामुळे बहुतेकवेळा त्याची भारतीय टीममध्ये निवड होत नाही. अशात भुवनेश्वर कुमारसारखाच स्विंग बॉलर म्हणून निवड समिती वर्ल्ड कपसाठी चहरचा विचार करू शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भुवनेश्वर कुमारने उत्कृष्ट बॉलिंग केली, पण आयपीएलमध्ये भुवीला पुन्हा काही सामने दुखापतीमुळे खेळता आले नाहीत. तसंच आयपीएलमध्ये भुवीने 5 सामन्यांमध्ये 9.10 च्या इकोनॉमी रेटने 5 विकेट घेतल्या.

दीपक चहरसोबतच मोहम्मद सिराज, आवेश खान आणि हर्षल पटेल या फास्ट बॉलरनीही आयपीएलमध्ये प्रभाव टाकला. 8 सामन्यांमध्ये 14 विकेटसह आवेश खान हा सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा बॉलर ठरला. तर हर्षल पटेल 17 विकेट घेऊन सगळ्यात यशस्वी बॉलर बनला. आवेश खान आणि हर्षल पटेल यांच्या या कामगिरीमुळे उमेश यादव आणि नवदीप सैनी यांना त्यांच्या टीमकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

दुसरीकडे टीम इंडियाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने 7 मॅचमध्ये 6 विकेट आणि शार्दुल ठाकूरने 7 मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या. बुमराहने 7.11 च्या इकोनॉमी रेटने आणि शार्दुलने तब्बल 10.33 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली.

स्पिनर्सच्या यादीत मुंबई इंडियन्सचा राहुल चहर सगळ्यात यशस्वी ठरला. राहुल चहरने 7 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या. चहरने कोलकात्याविरुद्ध 27 रन देऊन 4 विकेट आणि हैद्राबादविरुद्ध 19 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल याला मात्र संघर्ष करावा लागला. चहलने 7 सामन्यांमध्ये 8.26 च्या इकोनॉमी रेटने फक्त 4 विकेट घेतल्या. राहुल चहर आणि दीपक चहर या दोन भावांनी आयपीएलमधल्या त्यांच्या या कामगिरीमुळे निवड समितीला विचार करायला भाग पाडलं आहे.

First published:

Tags: Cricket, Hardik pandya, IPL 2021, Krunal Pandya, T20 world cup