Home /News /sport /

बायको असावी तर अशी, मॅच गमावल्यानंतर Deepak Chahar च्या गर्लफ्रेंडची इमोशनल पोस्ट

बायको असावी तर अशी, मॅच गमावल्यानंतर Deepak Chahar च्या गर्लफ्रेंडची इमोशनल पोस्ट

deepak chahar with Jaya Bhardwaj

deepak chahar with Jaya Bhardwaj

अखेरच्या वनडे सामनाही भारताला गमवावा लागल्याने दीपक चाहरला मैदानातच (deepak chahar crying) अश्रू अनावर झाले. त्याचे काही फोटो व्हिडीओ होत आहेत. अशातच त्याची होणारी बायको जया भारद्वाजने (Jaya Bhardwaj) एक इमोशनल पोस्ट शेअर करत त्याच्या प्रत्येक गोष्टीत कणखरपणे त्याच्यासोबत उभी असल्याची जाणीव करुन दिली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 25 जानेवारी: वनडे मालिकेत एकापाठोपाठ दोन पराभवानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa vs India 3rd ODI ) जिंकणाच्या आशेनं मैदानात उतरली खरी पण हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागल्यामुळे धडाकेबाज 54 रन्स करणाऱ्या दीपक चाहरला मैदानातच (deepak chahar crying) अश्रू अनावर झाले. त्याचे काही फोटो व्हिडीओ होत आहेत. अशातच त्याची होणारी बायको जया भारद्वाजने (Jaya Bhardwaj) एक इमोशनल पोस्ट शेअर करत त्याच्या प्रत्येक गोष्टीत कणखरपणे त्याच्यासोबत उभी असल्याची जाणीव करुन दिली आहे. जयाने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे. 'जेव्हा तू खेळतोस तेव्हा तो दिवस कठीण असतो आणि जेव्हा तू खेळत नाहीस तो दिवस त्याहून अधिक खडतर बनतो. ज्या प्रकारे तू मेहनत घेतोस, मैदानावर आणि मैदानाबाहेर तू दाखवलेली उत्कटता तिथेच तुला चॅम्पियन बनवते. क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात कधी जिंकतो, कधी हरतो पण देशाला तुमचा अभिमान आहे. अगदी खडतर लढायाही जिंकण्याची तयारी दाखवली आहेस. मला तुझा अभिमान आहे. जय हिंद !' असे तिने पोस्ट मध्ये म्हटले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Jaya Bhardwaj (@jayab05)

  यासोबत तिने चाहरे मैदानातील काही फोटो, जिममधील व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. सध्या क्रिकेट जगतात जयाच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. तिने चाहरवर दाखवलेल्या विश्वासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाच्या पदरी घोर निराशा आली. अखेरच्या वनडे सामनाही भारताला गमवावा लागला आहे. संपूर्ण टीम 283 रन्सवर ऑलआऊट झाली. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर दीपक चाहरने चिवट झुंज दिली. 34 बॉलमध्ये चहरने 54 रन्स केले. चहरने टीम इंडियाचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला होता. पण एनगिडीने त्याला आऊट केले. त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे टीम इंडियाचा डाव गडगडला आणि अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. हा पराभव पाहून दीपक चाहरला अश्रू रोखता आले नाही, त्याने मैदानावरच अश्रूना वाट मोकळी करून दिली.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Cricket news, Team india

  पुढील बातम्या