VIDEO : मुंबई इंडियन्सच्या स्टार गोलंदाजानं 20व्या वर्षी केला साखरपुडा, CSKच्या खेळाडूनं दिला आशीर्वाद

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या स्टार गोलंदाजानं 20व्या वर्षी केला साखरपुडा, CSKच्या खेळाडूनं दिला आशीर्वाद

मुंबईच्या खेळाडूच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या त्या चेन्नईच्या या खेळाडूवर.

  • Share this:

जयपूर, 13 डिसेंबर : एकीकडे आयपीएलच्या लिलावात कोणते खेळाडू कोणत्या संघात सामिल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 19 डिसेंबरला आयपीएलच्या तेराव्हा हंगामाचा लिलाव होणार आहे. दरम्यान त्याआधीच भारताचा हॅट्रिक मास्टर दीपक चाहरच्या धाकट्या भावानं साखरपुडा केला आहे. मुख्य म्हणजे राहुल चाहर हा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो तर, दीपक चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून. राहुलनं 20व्या वर्षीच इशानी नावाच्या आपल्या मैत्रीणीता जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतला. राहुलचा चुलत भाऊ दीपक चहर यांनी सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाहर बंधू जबरदस्त कामगिरी करत आहेत. दीपक आणि राहुल यांना काही क्रिकेट तज्ज्ञांनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेटचे भविष्य मानले आहे. 20 वर्षीय राहुल लेगस्पिनर आहे तर 27 वर्षीय दीपक वेगवान गोलंदाज आहे.

दीपक चहर यांनी इतिहास रचला होता

महिनाभरापूर्वी दीपक चहरने बांगलादेशविरूद्ध इतिहास रचला होता. 10 नोव्हेंबरला दीपकने बांगलादेश विरुद्ध नागपूर टी -20 सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. यात त्यानं हॅट्रिकही घेतली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडूही ठरला. जुलै 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दीपक चहरने आतापर्यंत फक्त एक वनडे आणि 10 टी -20 सामने खेळले आहेत.

लहान वयातच राहुल आला प्रकाशझोतात

दुसरीकडे, राहुल चहर लहान वयातच सर्वांच्या नजरेत आला. यावर्षी ऑगस्टमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, जिथे भारताने हा सामना सात विकेट्सने जिंकला होता. त्याचवेळी राहुलने विकेट घेतली. राहुलने कॅरेबियन कर्णधार कार्लोस ब्रेथवेटला त्याचा बळी ठरविला होता. राहुल बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेत टी -20 संघाचा देखील एक भाग होता.

2016मध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले

राहुलने नोव्हेंबर 2016 मध्ये राजस्थानमधून व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रवेश केला. या लेग स्पिनरने 16 प्रथम श्रेणी सामने, 35 लिस्ट आणि 35 टी -20 सामने खेळले आहेत. यात त्यानं अनुक्रमे 64, 60 आणि 39 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, आयपीएलमध्ये राहुल 2017 मध्ये पुणे सुपर जायंट्स संघात होता. तो सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने 16 आयपीएल सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.

First published: December 13, 2019, 2:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading