IPL 2019 : अश्विननं नाही तर 'या' नवख्या खेळाडूनं घेतली बटलरची विकेट

IPL 2019 : अश्विननं नाही तर 'या' नवख्या खेळाडूनं घेतली बटलरची विकेट

पंजाब आणि राजस्थान यांच्यात याआधी झालेल्या लढतीत पंजाबचा कर्णधार आर अश्विन यानं मकंड पद्धतीनं जॉस बटलरला बाद केलं होतं.

  • Share this:

मोहाली, 16 एप्रिल : आपल्या घरच्या मैदानावर बंगळुरू संघाकडून पराभव स्विकारल्यानंतर आज पंजाबचा संघ राजस्थानशी पुन्हा भिडत आहे. दरम्यान राजस्थान मागच्या सामन्याचा हिशेब चुकता करण्याच्या तयारीत असताना, सध्या पंजाबनं दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करत आहे.

राजस्थान 183 धावांचा पाठलाग करत असताना, राजस्थानच्या सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी करत असताना अश्विननं आपलं नव अस्त्र मैदानात उतरवलं. बटलरची आक्रमक फलंदाजी सुरू असताना, अश्निनने पंजाबकडून पदार्पण करत असलेल्या अर्शदीप सिंगच्या हातात चेंडू दिला. आणि त्यानं आपल्या पहिल्याच चेंडूत बटलरला बाद केलं.चांगल्या फॉर्ममध्ये असलेला बटलर 17 चेंडूत 23 धावा करत बाद झाला. त्यानं 2 सिक्स आणि 1 चौकार मारला होता. दरम्यान अर्शदीप आजच्या सामन्यात पदार्पण करणार की नाही, याबाबतच साशंकता असताना, शेवटच्या क्षणी त्याची वर्णी लागली आणि त्याला संघात स्थान मिळालं.पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अंडर 19 विश्वचषकात खेळलेला 20 वर्षांचा अर्शदीप पंजाब आणि हिमाचल संघाकडून एकदिवसीय क्रिकेट खेळतो. या फिरकी गोलंदाजानं प्रथम श्रेणीत हिमाचल प्रदेशकडून आपल्या पहिल्या सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. सी.के. नायडू करंडक मध्येही आठ विकेट घेत आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. त्यावेळी अर्शदीप पंजाब संघाकडून खेळत होता.

पंजाबसंघाकडून आयपीएलच्या बाराव्या हंगमात त्याला 20 लाखात विकत घेतले होते. दरम्यान आपली निवड सार्थ ठरवत सध्या फॉर्ममध्ये असलेल्या जॉस बटलरची विकेट अर्शदीपनं घेतली. पंजाब आणि राजस्थान यांच्यात याआधी झालेल्या लढतीत पंजाबचा कर्णधार आर अश्विन यानं मकंड पद्धतीनं जॉस बटलरला बाद केलं होतं. यावरुन अनेक बाद झाले होते. दरम्यान आजच्या सामन्यात अर्शदीपनं बटलरची विकेट घेतल्यानंतर अश्विनही जोरदार सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाला.


VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 10:59 PM IST

ताज्या बातम्या