Dear Basketball... हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये प्राण गमावणाऱ्या कोबीचं प्रेमपत्र डोळ्यात आणेल पाणी; ऑस्करविजेता VIDEO पाहाच

Dear Basketball... हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये प्राण गमावणाऱ्या कोबीचं प्रेमपत्र डोळ्यात आणेल पाणी; ऑस्करविजेता VIDEO पाहाच

दिग्गज खेळाडू म्हणून 20 वर्षांच्या कारकिर्दीला निरोप देताना त्यानं बास्केटबॉलला प्रेमपत्र लिहिलं. यावर तयार करण्यात आलेल्या शॉर्टफिल्मला ऑस्कर पुरस्कारही मिळाला.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : दिग्गज बाक्सेटबॉलपटू कोबी ब्रायंटच्या अपघाती मृत्यून क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे. जगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये समावेश होत असलेल्या ब्रायंटने त्याच्या कारकिर्दीत पाचवेळा एनबीए चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याने खेळात तर पुरस्कार पटकावलेच पण त्याच्या एका प्रेमपत्राने ऑस्कर पुरस्कार पटकावला होता.कोबे ब्रायंटने बास्केटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे पत्र लिहिलं होतं. 29 नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने पत्र लिहिलं आणि त्यावरच 2017 मध्ये अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मि चित्रित करण्यात आली. या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार पटकावला.

Dear Basketball...

जेव्हा माझ्या वडिलांचे सॉक्स गुंडाळून गोळा तयार केला

आणि सामना जिंकून देत असल्याच्या अविर्भावात या गोळ्याशी खेळू लागलो

त्यावेळी ग्रेट वेस्टर्न फोरममध्ये मला एकच खरी गोष्ट कळली,

तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो होतो

प्रेमात इतका बुडालो की तुला मी सगळं दिलं.

माझं मन आणि माझं शरीर,

माझी हिंमत आणि माझा आत्मासुद्धा !

एक सहा वर्षांचा मुलगा

तुझ्या प्रेमात पडला होता.

मी कधीच शेवट याचा काय आहे हे पाहिलं नाही.

मी फक्त स्वत:ला धावताना पाहिलं

आणि मी धावत सुटलो होतो.

हातातून काही निसटत असतानाही तुझ्यासाठी

धावत होतो..

वर आणि खाली, प्रत्येकाकडे दाद मागत

तू माझी आस्थेनं चौकशी केलीस,

मी तुला माझं हृदय दिलं होतं

घाम गाळत आणि पडत-झडतही मी खेळलो

कोणतंही आव्हान होतं म्हणून नाही

तर तू मला बोलवलंस म्हणून

मी तुझ्यासाठी ते सगळं केलं

जे तू माझ्यासाठीही केलंस

कोणीतरी तुम्ही जिवंत असल्याची जाणीव करून देतं

तसं तुझं असणंही माझ्यासाठी ती जाणीवच असायची.

तू सहा वर्षांच्या मुलाला लॅकरचं स्वप्न दाखवलंस

त्या स्वप्नासाठी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहीन

पण आता जास्त काळ प्रेम नाही करता येणार

आता थोडाच काळ उरलाय

त्यात मला राहून गेललं सगळं द्यायचं आहे

माझं हृदय अजूनही तुझ्यासाठी खूप धडधडू शकतं

माझं मन या सगळा गोंधळ सावरू शकेल

पण माझ्या शरीराला माहिती आहे आता निरोप घेण्याची वेळ आलीय.

आणि ठीक आहे.

तू दूर जाणार आहेस यासाठी मी तयारी केलीय.

मला वाटतं की आता तू समजून घ्यावं

दोघांनीही जे क्षण एकत्र घालवले

त्यातला चांगला आणि वाईट असा प्रत्येक क्षण आपण जपून ठेवू शकतो

आपल्याकडे असलेलं सर्व काही आपण एकमेकांना दिलं

आणि हे आपल्या दोघांनाही माहिती आहे

आता पुढे काय होईल त्याच्याशी देणंघेणं नाही

मी नेहमीच ते लहान मूल राहीन

सॉक्स गुंडाळणाऱं मूल

एका कोपऱ्यात कचरा करणारं मूल !

घड्याळात 5 सेकंद उरलेत

माझ्या हातात बॉल आहे

5... 4... 3... 2... 1

Love you always,

-Kobe

लॉस एंजलिसपासून 65 किमी अंतरावर कोबी ब्रायंटच्या मालकीच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यानंतर आग लागून हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळलं. भयंकर मोठ्या आगीमुळं बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमध्ये कुणीही वाचू शकलं नाही. या अपघातात कोबी ब्रायंटसह त्याची 13 वर्षांची मुलगी आणि 9 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. कोबी ब्रायंटने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनकडून खेळताना 5 स्पर्धाही जिंकल्या. कोबी त्याच्या करिअरमध्ये 18 वेळा 'एनबीए ऑल स्टार' ठरला. तर, 2016मध्ये तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑल स्टार खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली. कोबी ब्रायंटने 2012 आणि 2008च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.

‘तुझी जादू पाहण्यासाठी पहाटे उठायचो’, कोबी ब्रायंटच्या मृत्यूनंतर विराट भावूक

First published: January 27, 2020, 5:47 PM IST
Tags: basketball

ताज्या बातम्या