जयपूर, 22 एप्रिल : राजस्थानसाठी असलेल्या करो या मरो सामन्यात अखेर अजिंक्य रहाणेची बॅट तळपली. परंतु राजस्थानला हा सामना जिंकता आला नाही. रिषभ पंतच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीनं सामना फिरवला आणि सहा विकेटनं सामना जिंकला.
रहाणेच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानंन दिल्लीला 192 धावांचे आव्हान दिलं. रहाणेनं 11 चौकार आणि 3 षटकारांच्या तुफान खेळीनं 63 चेंडूत 105 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीनं सावध सुरुवात केली. त्यानंतर रिषभ पंतनं 36 चेंडूत 78 धावा केल्या. पंतनं 216.67च्या स्ट्राईक रेटनं दिल्लीला सामना जिंकवून दिला.
Rishabh Pant is all set to win a game for his team. Fluent half-century by the youngster.#RRvDC pic.twitter.com/TnX04Cdbyd
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2019
राजस्थानचा कर्णधार स्मिथने पहिल्या पाच षटकांत पाच खेळाडूंकडून गोलंदाजी करून घेतली. मात्र, शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. दुसरीकडे पृथ्वी शॉ संयमी खेळ करत होता. धवनने संघाच्या धावांचा वेग दहाच्या सरासरीने सुरू ठेवला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीने उडवलेला चेंडू टिपण्यात अॅश्टन टर्नरला अपयश आले. 10 धावांवर असताना पृथ्वीला जीवदान मिळाले. धवन आणि पृथ्वी यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि यंदाच्या मोसमातील सलामीवीरांनी नोंदवलेली ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली.
धवनने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण, 54 धावांवर तो बाद झाला. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने धवनला यष्टिचीत केले. धवनने 27 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा केल्या. त्यानंतर पंतनं आपलं दणक्यात अर्धशतक पुर्ण केलं.
Rishabh Pant brings up his 10th #VIVOIPL FIFTY off 26 deliveries 👌👌 pic.twitter.com/oZi2PKllHJ
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2019
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात यजमानांना धक्का बसला. अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांच्यात ताळमेळ न राहिल्याने राजस्थानला सुरुवातीलाच धक्का बसला. सॅमसन (0) धावबाद होऊन माघारी परतला. तर, अस्टॉन टर्नरही शुन्यावर बाद झाला. रहाणेनं 58 चेंडूत 100 धावा कुटल्या आणि त्यानं टी-20मधल्या आपल्या 3 हजार धावाही पुर्ण केल्या. दरम्यान रबाडाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानला केवळ 8 धावा करता आल्या. दरम्यान, जयपूरच्या मानसिंग मैदानावर 1 हजार धावांचा टप्पा पुर्ण करणारा रहाणे एकमेव फलंदाज आहे. तर, दिल्ली विरोधात रहाणेनं आतापर्यंत 746 धावा केल्या आहेत. यात आघाडीवर 802 धावांसह विराट कोहली आहे.
SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!