मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अन् पृथ्वी शॉने स्वत:लाच गिफ्ट केली BMW कार; म्हणाला, तळापासून सुरुवात केली होती...

अन् पृथ्वी शॉने स्वत:लाच गिफ्ट केली BMW कार; म्हणाला, तळापासून सुरुवात केली होती...

Prithvi Shaw

Prithvi Shaw

आयपीएल 2021 (IPL2021) मधील यशस्वी पर्व संपवून मायदेशी परतलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने स्वतःलाच एक खास गिफ्ट केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL2021) मधील यशस्वी पर्व संपवून मायदेशी परतलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने स्वतःलाच एक खास गिफ्ट केले आहे.

आयपीएल २०२१मधील यशस्वी पर्व संपवून मायदेशी परतलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ यानं नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याची माहिती त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. त्याने BMW 6 Series Gran Turismo ही गाडी खरेदी केली आहे.

एका फोटोमध्ये तो कारची डिलिवरी घेताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो कार चालवताना दिसून येत आहे. तसेच तिसऱ्या फोटोमध्ये तो कारचा कव्हर काढताना दिसून येत आहे. या फोटोला त्याने साजेशी अशी कॅप्शनदेखील दिली आहे.

‘तळापासून सुरुवात केली होती, आता इथे आहे…” असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. ही कार खरेदी केल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by PRITHVI SHAW (@prithvishaw)

त्यानं BMW 6 Series Gran Turismo ही गाडी खरेदी केली आहे आणि BMW 630i M Sport सेगमेंटमधील ही गाडी आहे. याच वर्षी या गाडीचं लाँचिंग झालं असून पृथ्वीनं सफेद रंगाला पसंती दिली. या गाडीची (ex-showroom किंमत ही 68.50 लाख इतकी आहे. BMW 6 Series GT ही गाडी 630 i M Sport, 620d Luxury Line आणि 630d M Sport या व्हेरिएंटमध्ये मिळत आहे. या गाडीची किंमत 68.50 लाख ते 79.20लाख ( ex-showroom) इतकी आहे.

पृथ्वी शॉ ची आयपीएल 2021 स्पर्धेतील कामगिरी

आयपीएल 2021 च्या सिझन 14 मध्ये पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी काही महत्वपूर्ण खेळी केली. त्याने 15 सामन्यात 31.93 च्या सरासरीने 479 धावा केल्या. या दरम्यान त्याने 4 अर्धशतक झळकावले होते. तर 82 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. या हंगामात त्याने 56 चौकार आणि 18 षटकार देखील मारले आहेत. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 53 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला 24.62 च्या सरासरीने 1305 धावा केल्या आहेत. यादरम्यान 99 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

First published:

Tags: Cricket news, Delhi capitals, Prithvi Shaw