ऐतिहासिक कसोटी सामन्याची सुरू आहे ग्रँड तयारी; होणार गोल्डन टॉस!

ऐतिहासिक कसोटी सामन्याची सुरू आहे ग्रँड तयारी; होणार गोल्डन टॉस!

22 नोव्हेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर होणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 06 नोव्हेंबर: भारतात होणाऱ्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने मोठी जय्यत तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सामन्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आमंत्रण पाठवले आहे. हसीना यांनी हे आमंत्रण स्विकारले असून त्या देखील हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. त्याशिवाय बंगाल क्रिकेट बोर्डाने देखील या सामन्यासाठी ग्रँड वेलकमची तयारी सुरु केली आहे.

शेख हसीना यांच्याशिवाय अनेक दिग्गज लोकांना या सामन्यासाठी बोलवण्यात येणार आहे. सामन्यासाठी होणाऱ्या या खास लोकांसाठी 50 पद्धतीचे पदार्थ तयार केले जाणार आहेत. इतक नव्हे तर अनेक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असलेल्या या मैदानावरील या डे-नाईट सामन्यात वापरण्यात येणारा टॉस हा सोन्याचा असेल. तर चांदीचा टॉस हा पाहुण्यांना भेट स्वरुपात दिला जाणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधानांसाठी ग्रँड रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. यासाठी हिल्सा, भेटकी, दाब चिंग्री असे मासे ठेवण्यात आले. याशिवाय खास बंगाली पदार्थ देखील असणार आहेत. यात शुक्तो, आलू पोस्तो, रोस्टेड कॉलीफ्लॉवर, चनार डालना, पुलाव चटणी आदीचा समावेश असणार आहे. याशिवाय चिकन आणि मटनाचे पदार्थ देखील असणार आहेत.

वाचा-रोहित देणार 'या' मुंबईकर खेळाडूला संघात जागा, दुसऱ्या टी-20 सामन्यात होणार बदल

भारतात होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासंदर्भातील तयारीचा अंतिम निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुली शेख हसीना यांना एक स्पेशल साडी देखील भेट देणार आहेत. केवळ शेख हसीना नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सामना पाहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय भारतीय संघाचे आतापर्यंतचे सर्व कसोटीतील कर्णधारांना या सामन्यासाठी खास आमंत्रण पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. याच सामन्यात धोनी समालोचक म्हणून सामिल होऊ शकतो. 2014मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेणारा धोनी आता समालोचन करताना दिसणार आहे.

वाचा-दुसरा टी-20 सामना रोहितसाठी ठरणार खास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय

असे आहेत डे-नाईट सामन्याचे नियम

पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

वाचा-RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 11:34 AM IST

ताज्या बातम्या