मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20WC: लढतीपूर्वीच नामिबियाच्या खेळाडूचा Team India ला इशारा; 'सामन्यात काहीही होऊ शकत'

T20WC: लढतीपूर्वीच नामिबियाच्या खेळाडूचा Team India ला इशारा; 'सामन्यात काहीही होऊ शकत'

david wiese

david wiese

टीम इंडियाने (Team India) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध दमदार कामगिरी करत पुनरागमन केले. टीम इंडियाची आगामी लढत नामिबियाविरुद्ध होणार आहे.

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: टीम इंडियाने (Team India) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध  दमदार कामगिरी करत पुनरागमन केले. टीम इंडियाची आगामी लढत नामिबियाविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या लढतीपूर्वीच नामिबियाचा महान अष्टपैलू खेळाडू डेविड विसेने (david wiese) भारताविरुद्धच्या सामन्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नामिबिया संघ जरी कमकुवत वाटत असला तरी या सामन्यात काहीही होऊ शकते, असे त्याने म्हटले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, डेविड विसे याने भारतीय संघाविरुद्धच्या सामन्याबाबत भाष्य केले. “भारतीय संघाविरुद्ध खेळणे नेहमीच छान असते. भारतीय संघाला चाहत्यांचा खूप पाठिंबा असतो. भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. तुम्हाला अशाच खेळाडूंविरुद्ध तर खेळायचे असते.

काही खेळाडू या सामन्यात चांगली कामगिरी करू शकतात आणि त्यांना त्याचा इतरत्र फायदा होऊ शकतो. आमचा संघ कमकुवत वाटत असला तरी, सामन्यात काहीही होऊ शकते.” असे विसे याने म्हटले आहे.

सोमवारी भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल. नामिबियाने आतापर्यंत एक सामना जिंकला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india