मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 च्या Mega Auction आधी काही टीम डेव्हिड वॉर्नरच्या संपर्कात!

IPL 2022 च्या Mega Auction आधी काही टीम डेव्हिड वॉर्नरच्या संपर्कात!

आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर (David Warner) सनरायजर्स हैदराबादचा (SRH) सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू होता, पण या मोसमात (IPL 2021) खराब फॉर्ममुळे त्याचे आणि टीम मॅनेजमेंटमध्ये वाद झाल्याचं समोर आलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर (David Warner) सनरायजर्स हैदराबादचा (SRH) सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू होता, पण या मोसमात (IPL 2021) खराब फॉर्ममुळे त्याचे आणि टीम मॅनेजमेंटमध्ये वाद झाल्याचं समोर आलं. यानंतर वॉर्नरचा हैदराबादच्या टीमसोबतचा हा अखेरचा मोसम असल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं. आयपीएल इतिहासात सर्वाधिक तीन वेळा सगळ्यात जास्त रन केल्याबद्दलची ऑरेंज कॅपही वॉर्नरला मिळाली आहे. 2016 साली वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादला पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकता आली.

आयपीएलच्या या मोसमात खराब कामगिरीनंतर वॉर्नरला कॅप्टन्सीवरून काढण्यात आलं, यानंतर त्याला प्लेयिंग इलेव्हनमधूनही डच्चू देण्यात आला. या मोसमात त्याने 8 सामन्यांमध्ये 24.47 च्या सरासरीने 195 रन केले. 2014 पासून वॉर्नर हैदराबादच्या टीमसोबत आहे. या सिझनआधी त्याने प्रत्येक वर्षी 500 पेक्षा जास्त रन केले.

यंदाच्या आयपीएलमधलं हैदराबादचं आव्हान लवकर संपुष्टात आलं. यानंतर वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून हैदराबादसाठीचा हा आपला अखेरचा मोसम असल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.

'आठवणी तयार केल्याबाबत धन्यवाद. सगळे चाहते आमच्यासाठी चांगली कामगिरी करायला आणि मैदानात 100 टक्के द्यायला प्रोत्साहित करतात. पाठिंबा दिल्याबद्दल फक्त धन्यवाद हा शब्दही तोकडा आहे. मी आणि माझं कुटुंब तुम्हाला मिस करणार आहोत,' असं वॉर्नर त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.

आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. वॉर्नरही या लिलावात सहभागी होणार आहे, पण काही टीम आधीपासूनच त्याच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.

First published:

Tags: David warner, Ipl, SRH