IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर नाम तो सुनाही होगा...पण त्याचा हा विक्रम पाहिलात का?

बॉल टॅम्परिंग प्रकरणी एका वर्षाच्या क्रिकेट बंदीनंतर आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनं आपलं पुनरागमन केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 08:13 PM IST

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर नाम तो सुनाही होगा...पण त्याचा हा विक्रम पाहिलात का?

हैदराबाद, 21 एप्रिल : बॉल टॅम्परिंग प्रकरणी एका वर्षाच्या क्रिकेट बंदीनंतर आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनं आपलं पुनरागमन केलं. हैदराबादकडून सलामीला येणाऱ्या वॉर्नरनं पहिल्या सामन्यापासून धडाकेबाज फलंदाजी करत, आपला फॉर्म कायम ठेवला आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना कोलकाता विरोधात अशीच तुफानी फलंदाजी करत, बाराव्या हंगमातील 500 धावांचा टप्पा गाठला.दरम्यान वॉर्नरनं 2018 साली बंदीचं वर्ष वगळता 2014, 2015, 2016, 2017 आणि 2019 या वर्षांमध्ये वॉर्नरनं आयपीएलमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.कोलकात्याविरुद्ध सामन्यात वॉर्नरनं आपला साथी जॉनी बेअरस्टो सोबत शतकी भागीदारी केली. आणि आपलं अर्धशतकही पुर्ण केलं. वॉर्नरने 38 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. डेव्हिड वॉर्नरप्रमाणेच विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली आहे. त्यांच्यासोबत रैना, गंभीर, गेल यांनीही असा पराक्रम केला आहे.हैदराबादनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आणि कोलकातला केवळ 159 धावांवर रोखले. दरम्यान प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 72 धाव चोपून काढल्या. या जोडीने शतकी भागीदारी करताना आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमधील या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादनं कोलकातावर एकहाती विजय मिळवला. बेअरस्टोनं 15व्या ओव्हरमध्येच सामना संपवला. या विजयानंतर हैदराबादचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे. तर, कोलकाताचा संघ 6 स्थानावर आहे.


VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...