Home /News /sport /

वॉर्नरचा हा VIDEO पाहून विराटही चक्रावला, म्हणाला 'मित्रा बरा आहेस ना?'

वॉर्नरचा हा VIDEO पाहून विराटही चक्रावला, म्हणाला 'मित्रा बरा आहेस ना?'

ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियावर बराच ऍक्टिव असतो. वॉर्नरचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांचं मनोरंजनही करतात. वॉर्नरने शनिवारीही असाच एक व्हिडिओ शेयर केला.

  मुंबई, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियावर बराच ऍक्टिव असतो. वॉर्नरचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांचं मनोरंजनही करतात. वॉर्नरने शनिवारीही असाच एक व्हिडिओ शेयर केला, यात तो अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा- द राईज'च्या गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नरने फेस स्वॅप ऍपचा वापर केला आहे, ज्यात त्याने अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर स्वत:चा चेहरा लावला आहे. डेव्हिड वॉर्नर ऍशेस सीरिज (Ashes Series) खेळत असला तरी सोशल मीडियावर मात्र तो चांगलाच व्यग्र आहे. ऍशेसच्या पहिल्या सामन्यात वॉर्नरने 94 रनची खेळी केली, ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 विकेटने जिंकला. सोबतच 5 टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. virat kohli comment on david warner video पहिल्या सामन्यातल्या विजयानंतर वॉर्नरने एक व्हिडिओ पोस्ट केला, यात तो पुष्पा चित्रपटाचं गाणं 'आई बिड्डा इधि ना अड्डा' वर अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर आपला चेहरा लावून नाचत आहे. वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू असूनही हॉलिवूडपेक्षा बॉलिवडू आणि टॉलिवूड चित्रपटांची गाणी जास्त शेयर करतो. वॉर्नरच्या या व्हिडिओला आतापर्यंत 16 लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. मित्रा ठीक आहेस ना? असा प्रश्न विराटने वॉर्नरला विचारला. थोडा त्रास होतो, पण मला माहिती आहे, तू माझ्या डोक्यात आहेस. कधी ठीक होणार नाही, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने विराटच्या कमेंटवर दिली.
  याआधी वॉर्नरने रजनीकांतच्या एका गाण्यावरही डान्स केला होता, त्या व्हिडिओमध्येही वॉर्नरने फेस स्वॅपचा वापर केला होता. वॉर्नरने ऍशेस टेस्टच्या पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 176 बॉलमध्ये 94 रन केले, यात 11 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. या सामन्यात इंग्लंडची पहिली इनिंग 147 रनवर संपुष्टात आली, यानंतर ऑस्ट्रेलियाने 425 रन केले. इंग्लंडला दुसऱ्या इनिंगमध्ये 297 रनपर्यंत मजल मारता आली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अखेरच्या इनिंगमध्ये विजयासाठी 20 रनचं आव्हान मिळालं, हे आव्हान त्यांनी 1 विकेट गमावून पार केलं. ऑस्ट्रेलियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: David warner, Virat kohli

  पुढील बातम्या