मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ...म्हणून David Warner ने सोडली आयपीएल, SRH मधून समोर आली धक्कादायक माहिती

IPL 2021 : ...म्हणून David Warner ने सोडली आयपीएल, SRH मधून समोर आली धक्कादायक माहिती

David Warner ला हैदराबादकडून वाईट वागणूक ; टीमसोबतचा प्रवास थांबवला?

David Warner ला हैदराबादकडून वाईट वागणूक ; टीमसोबतचा प्रवास थांबवला?

आयपीएल 2021 (IPL 2021)चा हंगाम डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) खूप वाईट होता. सनरायझर्स हैदराबादच्या खराब कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले. नंतर प्लेइंग इलेव्हनमधूनही वॉर्नरला वगळण्यात आले. सनरायझर्स हैदराबादसोबत त्याचा हा शेवटचा हंगाम असल्याची चर्चा रंगली आहे. .

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021)चा हंगाम डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) खूप वाईट होता. सनरायझर्स हैदराबादच्या(Sunrisers Hyderabad) खराब कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले. नंतर प्लेइंग इलेव्हनमधूनही वॉर्नरला वगळण्यात आले. सनरायझर्स हैदराबादसोबत त्याचा हा शेवटचा हंगाम असल्याची (Has David Warner played his last match for Sunrisers Hyderabad)चर्चा रंगली आहे. दरम्यान, हैदराबाद व्यवस्थापनाकडून डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान, वॉर्नर हॉटेलमध्येच थांबला होता. शारजाह येथे खेळण्यात आलेल्या सामन्यासाठी वॉर्नरला टीमसोबत बस प्रवास करण्यास परवानगी दिलेली नाही.

हे वाचा- 'कुछ तो बात है जर्सी नंबर 18 में'; विराटनंतर मंधानाने पिंक बॉलवर शतक झळकावलं

एका युट्यूब चॅनलवर सांगण्यात आले आहे की, मोहम्मद नबी आणि मनीष पांडे सारख्या वरिष्ठ खेळाडूंची नावे हैदराबाद टीममध्ये सहभागी होती. परंतु, वॉर्नर अनुपस्थित होता. यापूर्वीही, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही वॉर्नर स्टेडियममध्ये नव्हता. तो हॉटेलमधूनच मॅच बघत होता. विजयानंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये टीव्हीचे फोटो काढून आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

हैदराबाद आयपीएल 2021 मध्ये अजून तीन सामने खेळणार आहे, यामध्ये वॉर्नर दिसणार नाही. तसेच, हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. 11 पैकी त्यांनी फक्त दोनच सामने जिंकले आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान जेव्हा डेव्हिड वॉर्नर स्टेडियममध्ये दिसला नाही, तेव्हा, ''तरुणांना संधी देण्यासाठी वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. असे हैदराबादचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस म्हणाले होते.

हे वाचा-KKR vs PBKS, Dream 11 Prediction : 'हे' 11 खेळाडू बदलतील तुमचं नशीब

बेलिस मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, 'जर आम्ही पुढच्या फेरीत जाऊ शकलो नाही, तर आम्ही तरुणांना संधी देण्याचे ठरवले आहे. जेणेकरून त्यांना अनुभव मिळेल, असे आम्ही ठरवले. संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत जे खेळाच्या मैदानावर आलेले नाहीत. त्यांना संधी द्यायला हवी. हा ट्रेंड पुढील सामन्यांमध्येही कायम राहील. वॉर्नरने हॉटेलमध्ये मॅच पाहिली आणि टीमला चीअर केले. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आहोत. अशी प्रतिक्रिया बेलिस यांनी दिली.

First published:

Tags: Cricket news, David warner