मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'तुम्हा सर्वांना मिस करू'; भावनिक पोस्ट करत David Warner ने SRH संघाला केले गुड बाय

'तुम्हा सर्वांना मिस करू'; भावनिक पोस्ट करत David Warner ने SRH संघाला केले गुड बाय

'तुम्हा सर्वांना मिस करू'; David Warner ने SRH संघाला केले गुड बाय

'तुम्हा सर्वांना मिस करू'; David Warner ने SRH संघाला केले गुड बाय

सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) संघाच्या आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि फ्रँचायझीला पुढील वर्षासाठी रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) संघाच्या आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि फ्रँचायझीला पुढील वर्षासाठी रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत.

आजच्या सामन्यात तरी त्याला संधी द्यायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. पण, आजही संधी न मिळाल्यानं वॉर्नरनं इंस्टाग्रावर भावनिक पोस्ट गुड बाय म्हटले आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या संघाच्या सतत मागे उभे राहुन प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी माझे आभाराचे दोन शब्दही कमी पडतील. हा सुखमयी प्रवास होता. मी आणि माझे कुटुंबीय तुम्हा सर्वांना मिस करू.

डेविड वॉर्नरचा आयपीएलचा हा हंगाम चांगला राहिला नाही. त्याने एक कर्णधार म्हणून सुरूवात केली होती मात्र सातत्याच्या पराभवामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्या जागी केन विल्यमसन्सला कर्णधार बनवण्यात आले. यानंतर वॉर्नरला प्लेईंग इलेव्हनमधूनही बाहेर टाकण्यात आले. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातच सनरायजर्स हैदराबादने २०१६मध्ये आयपीएलचा खिताब जिंकला होता.

First published:

Tags: David warner, IPL 2021