तीन मुलींचा बाप असलेल्या वॉर्नरच्या नवपिता विराटला खास टिप्स!

तीन मुलींचा बाप असलेल्या वॉर्नरच्या नवपिता विराटला खास टिप्स!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना 11 जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झाले. यानंतर शुभेच्छा देताना डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने विराटला टिप्स घेण्यासाठी मला मेसेज कर, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना 11 जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झाले. ही आनंदाची बातमी विराटने सोशल मीडियावर पोस्ट टाकून जगजाहीर केली. देशातल्या तरुणाईची आयकॉन असणारी ही जोडी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतच आहेत, पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यालाही तितकच महत्त्व देत आहेत.

विराट-अनुष्काच्या आयुष्यातील या गोड क्षणाबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियावर जणू झुंबडच उडाली आहे. दोघांचे जगभरातील चाहते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत आहेत.

अनेक जण त्यांना सल्लाही देत आहेत, त्यात समावेश आहे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) याचा. सोशल मीडियावरील विराटच्या पोस्टवर वॉर्नरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी लिहिलंय, ‘अप्रतिम बातमी! भावा अभिनंदन. DM me for some tips.’ म्हणजे टिप्ससाठी मला मेसेज कर.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

क्रिकेटपटू कोणत्याही देशाकडून खेळत असले तरीही त्यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले असतात. सध्या तर आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे वेगवेगळ्या देशांचे खेळाडू एकाच टीममधून खेळतात. त्यामुळे तर त्यांची आणखीच गट्टी जमते. विराट आणि वॉर्नर हे दोघेही गेली अनेक वर्षे आपापल्या देशांचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करत आहेत.

डेव्हिड वॉर्नरला तीन मुली आहेत. डेव्हिडने 2015 मध्ये कँडिस फालझॉनशी लग्न केलं. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियात त्याला स्पोर्ट्स डॅड ऑफ द इयर म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे डेव्हिडने हक्कानी सल्ला देणार असल्याचं म्हटलंय.

विराट आणि अनुष्का यांनी 2017 च्या डिसेंबर महिन्यात लग्न केलं. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी अनुष्का गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती, आणि आता 11 जानेवारी 2021 ला त्यांच्या जीवनात एका गोड परीने प्रवेश केला आहे. अनुष्का आणि बाळ दोघींची तब्येत उत्तम आहे. खासगी आयुष्याचा आदर करा, असं विराटने पोस्टमध्ये म्हटलं होतं. दुसरीकडे या स्टार्सच्या चाहत्यांनी त्यांच्या मुलीसाठी नावं सुचवायलाही सुरुवात केली होती.

First published: January 13, 2021, 3:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading