VIDEO: डेव्हिड वॉर्नरचं टॉलिवूड प्रेम; पत्नी आणि लेकीसोबत ‘बूटा बुमा’ अफलातून डान्स

VIDEO: डेव्हिड वॉर्नरचं टॉलिवूड प्रेम; पत्नी आणि लेकीसोबत ‘बूटा बुमा’ अफलातून डान्स

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं (David warner) टॉलीवूड प्रेम लपून राहिलेलं नाही. त्याने नुकताच बूटा बोमा या गाण्यावर पत्नीसोबत डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याच्या चिमुरड्या मुलीने केलेला डान्सही भन्नाट आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला (David warner) जसा खेळात रस आहे तशीच त्याला सिनेमामध्येही रुची आहे. खासकरुन डेव्हिड वॉर्नरने टॉलिवूडच्या गाण्यांचा आणि संवादांचा तो प्रचंड मोठा फॅन आहे. डेव्हिडने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा आणि त्याचा पत्नीचा डान्स उत्तम आहेच पण खरी मजा आली आहे ती त्याच्या मुलीच्या एन्ट्रीमुळे. डेव्हिडने बूटा बोमा या गाण्यावर डान्स केला आहे.

डेव्हिडने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो त्याची पत्नी कॅन्डिन्स अल्लू अर्जुन चित्रपटातील बूटा बोमा या गाण्यावर डान्स करत आहेत. असं दिसत आहे. आणि अचानक त्यांची मुलगी नाचत त्या व्हिडीओमध्ये आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांनी बरेच लाइक्स आणि अनेक भन्नाट कॉमेंट्स केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. अनेकवेळा वॉर्नर त्याची पत्नी कॅन्डिस आणि दोन मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करतो. वॉर्नरने लॉकडाऊनमध्ये त्याच्या कुटुंबासोबत बनवलेले टिकटॉक व्हिडिओही व्हायरल झाले होते. वॉर्नरने पाच वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात केन्डिसशी लग्न केलं होतं. डेव्हिड वॉर्नर हा आयएपीलमध्ये हैदराबाद सनरायझर्स या संघाचा कर्णधार आहे. दरम्यान, आता भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौराही सुरू होणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय, तीन टी-20 सामने होणार आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 21, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या