Home /News /sport /

IPL 2021 मधून मोठी बातमी! वॉर्नर-स्मिथसह 30 ऑस्ट्रेलियन दिग्गज परतणार मायदेशी- रिपोर्ट

IPL 2021 मधून मोठी बातमी! वॉर्नर-स्मिथसह 30 ऑस्ट्रेलियन दिग्गज परतणार मायदेशी- रिपोर्ट

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्समधील (Delhi Capitals) महत्त्वाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात.

    मुंबई, 27 एप्रिल: देशात कोरोनाचे संकट (Coronavirus in India) वाढते आहे. या परिस्थितीत सध्या सुरू असणाऱ्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेवरील सावट देखील वाढते आहे. आयपीएल स्पर्धा अद्याप सुरू का आहे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 4 खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान काही मीडिया अहवालांच्या मते दिल्ली कॅपिटल्समधील (Delhi Capitals) महत्त्वाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. याआधी ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी परतले आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे केन रिचर्डसनस आणि एडम झम्पा आणि राजस्‍थान रॉयल्‍सच्या अँड्रयू टायचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया अहवालानुसार हे खेळाडू मायदेशी परतण्याची शक्यता आहे. चॅनेल9 च्या वृत्तानुसार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टार्स ऑस्ट्रेलियामध्ये परतण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद होण्याची शक्यता आहे. फॉक्स स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार इतर खेळाडू, त्याव्यतिरिक्त असणारा स्टाफ, कोच, कॉमेंटेटर असे मिळून एकूण 30 जण ऑस्ट्रेलियात परत जाण्यास इच्छूक आहेत. भारतात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तरी देखील आयपीएल स्पर्धा सुरू असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये चिंतेचं वातावरण आहे. (हे वाचा-IPL 2021 : 'कोणी खेळाडू देता का खेळाडू?' या टीमने उधारीवर मागितले क्रिकेटपटू) हे सर्व खेळाडू खाजरी विमानाने ऑस्ट्रेलियामध्ये परतण्याची शक्यता आहे. दरम्यान अद्याप दिल्ली कॅपिटल्स किंवा सनरायजर्स हैदराबादकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. स्मिथ किंवा डेव्हिड यांनी देखील अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. बड्या खेळाडूंची आयपीएलमधून माघार भारतात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे काही परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. यामध्ये राजस्थानचा (Rajasthan Royals) लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), अँन्ड्रयू टाय (Andrew Tye) तसंच बँगलोरच्या (RCB) केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि एडम झम्पाचा (Adam Zampa) समावेश आहे. कुटुंबातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली कॅपिटलचा स्टार गोलंदाज आर अश्विनने आयपीएलच्या 14 व्या मोसमातून (IPL 2021) माघार ( R Ashwin take break) घेतली आहे. त्याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली असून आपल्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची (R ashwin Family infected with corona virus) बाधा झाली असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: David warner, IPL 2021

    पुढील बातम्या