IPL 2019 : कोहलीचे मनसुबे पॉवरप्लेमध्येच फेल

वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्या जोडीनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग तीन वेळा 100 धावांची भागीदारी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 04:54 PM IST

IPL 2019 : कोहलीचे मनसुबे पॉवरप्लेमध्येच फेल

हैदरबाद, 31 मार्च : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मात्र, आज होत असलेल्या सामन्यात कोहलीचे मनसुबे फेल होताना दिसत आहेत.

Loading...

कोहलीनं प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय विराटला फळास आल्याचे चित्र सध्या दिसत नाही आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची आतषबाजी सुरूच आहे. वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्या जोडीनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग तीन वेळा 100 धावांची भागीदारी केली आहे.

हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या परदेशी जोडीने हैदराबादच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. ६ षटकाच्या पॉवर प्ले मध्ये त्यांनी ५९ धावांची सलामी दिली. विराटनं सामन्याची सुरूवात मोईन अलीकडून करुन एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न काही सफल झाला नाही. मोईन अलीनं आपल्या पहिल्या ओव्हरमध्येच 14 धावा दिल्या. त्यानंतर कोहलीनं जलद गोलंदाज उमेश यादवच्या हातात चेंडू दिला, मात्र त्यालाही काही विशेष कमाल करता आली नाही. उमेशच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरनं लांबलचक षटकार मारला. त्यानंतर विराटनं पुन्हा फिरकी गोलंदाजाला आणले, मात्र चहलची गोलंदाजीही चालली नाही.

बंगळुरूला आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर हैदराबादने दोन सामन्यांत एक विजय मिळवला आहे. हैदराबादने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे 199 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. बंगळुरूच्या तगड्या फलंदाजांसमोर त्यांना निभाव कसा लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यात बंगळुरूची गोलंदाजी चालत नसल्यामुळं कोहलीची चिंता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...